1. कृषीपीडिया

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या संदर्भात जागरूक राहून आवश्यकतेनुसार करा उपाययोजना

प्रमुख कीटक शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या संदर्भात जागरूक राहून आवश्यकतेनुसार करा उपाययोजना

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या संदर्भात जागरूक राहून आवश्यकतेनुसार करा उपाययोजना

प्रमुख कीटक शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या चमूने दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव व बोरगाव मंजू परिसरात प्रक्षेत्र भेट देऊन सर्वेक्षण केले असता कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे विशेषता कॉटन जिनिंग मिलच्या आजूबाजूच्या कपाशीच्या शेतात व साधारणता जूनच्या पहिल्या आठवड्यात

लागवड केलेल्या कपाशीवर हा कपाशीवरील गुलाबी बोंड आळी चा प्रादुर्भाव आढळून आला असून त्यामुळे लवकर जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी तसेच इतर शेतकऱ्यांनी सुद्धा वेळोवेळी आपले शेतात निरीक्षण घेऊन व कपाशी पिकाचे सर्वेक्षण करून जागृत राहून कपाशीवरील गुलाबी बोंड अळी संदर्भात आवश्यकतेनुसार उपाय योजनेचा अंगीकार करणे

गरजेचे आहे. सन्माननीय शेतकरी कपाशीचे पीक ज्या भागात 30 ते 40 दिवसाचे झालेले आहे म्हणजेच कपाशीला फुल लागण्यास सुरुवात झाली असल्यास अशा भागात गुलाबी बोंड अळीने प्रादुर्भावग्रस्त झालेली फुले म्हणजेच न उमलेल्या गुलाब्याच्या कळी सारखी दिसणारी कपाशीची फुले म्हणजेच डोमकळी आढळून आल्यास अशा डोमकळीग्रस्त कपाशीच्या फुलात हमखास गुलाबी बोंड अळीची अळी आढळून

येते. अशा डोमकळीग्रस्त कपाशीच्या फुलात ही गुलाबी बोंड आळी फुलाच्या आतील भाग खाते त्यामुळे अशा फुलांचे रूपांतर बोंडात होत नाही किंवा अशी फुले गळून पडतात. पुढे कपाशीच्या फुलाचे बोंडात रूपांतर झाल्यानंतर कपाशीवरील गुलाबी बोंड अळीची अळी बोंडाच्या आत शिरून बोंडाच्या आतील भागावर उपजीविका करते व त्यामुळे कपाशीचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात घट

येते. तेव्हा शेतकरी बंधूंनी सद्यस्थितीत जागृत राहून वेळोवेळी कपाशीच्या शेताचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार कपाशीवरील वरील गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाययोजनेचा अंगीकार करावा.(१) कपाशीला पात्या किंवा फुले लागण्यास सुरुवात झाल्याबरोबर हेक्टरी पाच कामगंध सापळे म्हणजेच एकरी दोन कामगंध सापळे Gossilure किंवा

Pectinolure या गुलाबी बोंड अळीच्या कामगंध गोळी सह म्हणजेच Lure सह पिकाच्या उंचीच्या वर एक ते दीड फूट उंची ठेवून लावावेत. या सापळ्यात मादी पतंगाच्या वासामुळे गुलाबी बोंड अळीचे नर पतंग आकर्षिले जाऊन अडकून पडतात. या सापळा मध्ये जमा झालेले नर पतंग दररोज काढून मोजून मारावेत.या सापळ्यात सरासरी आठ ते दहा गुलाबी बोंड अळीचे नर पतंग सतत दोन ते तीन दिवस

आढळून आल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी योग्य ते उपाय योजावेत असा त्याचा संकेत आहे. साधारणता 20 ते 25 दिवसाच्या अंतराने प्रत्येक सापळ्यातील कामगंध गोळी बदलवावी.(२) कपाशी पिकात फुलाच्या अवस्थेत न उमललेल्या गुलाबाच्या कळी सारख्या डोम कळ्या म्हणजे गुलाबी बोंड आळी ग्रस्त फुले आढळल्यास दर आठवड्यात पिकांमध्ये मजुराच्या साह्याने अशा डोम कळ्या

शोधून नष्ट कराव्यात. सर्वप्रथम पीक 90 दिवसाचे होईपर्यंत कपाशीच्या शेतातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात(३) ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी मित्रकीटकांची अंडी असलेले कार्ड म्हणजे ट्रायकोकार्ड प्रति एकर 3 कार्ड म्हणजेच ट्रायकोग्रामा या मित्रकीटकांची साठ हजार अंडी प्रती एकर याप्रमाणे कपाशीला पात्या लागल्यापासून सात ते आठ वेळा पिकांमध्ये दर दहा दिवसानंतर पानाच्या

मागच्या बाजूने लावावे म्हणजे सर्व प्रकारच्या बोंड आळीचे अंडी अवस्थेत व्यवस्थापन मिळू शकते.(४) मोनोक्रोटोफास, ॲसीफेट या सारख्या मध्यम ते खूप विषारी कीटकनाशकाचा कपाशीच्या सुरुवातीच्या अवस्थेत पहिले साठ दिवस फवारणीसाठी वापर टाळावा त्यामुळे शत्रु किडींवर जगणाऱ्या मित्र किडींचा नाश होऊन कपाशी सुरुवातीच्या अवस्थेत लुसलुशीत होऊन तिची

अतिरिक्त कायिक वाढ होऊ शकते व त्यामुळे कपाशी वर शत्रु किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.(५) कपाशी पीक पात्या फुले व बोंडे भरण्याच्या अवस्थेत असताना सुरुवातीला पाच टक्के निंबोळी अर्क किंवा किंवा Azadirachtin 1500 PPM 25 मिली + 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.(६) कपाशीवर गुलाबी बोंड अळी ने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर म्हणजेच

पाच टक्के याच्यावर फुलाच्या अवस्थेत गुलाबी बोंड आळी ग्रस्त फुले किंवा त्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळल्यास खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.क्लोरोपायरीफॉस 20 % प्रवाही 25 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Quinolphos 25% एफएस 25 मिली अधिक दहा लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार आर्थिक

नुकसानीची पातळी लक्षात घेऊन फवारणी करावी.(७) कपाशीच्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आढळून आल्यास खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशित प्रमाणात घेऊन फवारणी करावीथायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्यू पी 20 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणीकिंवा Indoxacarb 15.8 % प्रवाही 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन वर निर्देशित

कीटकनाशक यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.(८) कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा चा प्रादुर्भाव दहा टक्के च्या वर आढळून आल्यास खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशित प्रमाणात घेऊन फवारणी करावी.Emabectin benzoate 5 % SG 4 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा संयुक्त किंवा मिश्र कीटकनाशक Profenophos (प्रोफेनोफोस) 40% + Cypermethrine

4% 20 मिली अधिक दहा लिटर पाणीकिंवा Chloropyriphos 50 % + Cypermethrine 5 % या मिश्र कीटकनाशकाची 20 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Cypernethtine 10 % + Indoxacarb 10 % या संयुक्त किंवा मिश्र कीटकनाशकाची 10 मिली अधिक दहा लिटर पाणीवर निर्देशित प्रमाणात घेऊन आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन गरजेनुसार कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.

रसायने फवारताना किंवा कीडनाशके फवारणी करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे व प्रमाण पाळावे.कीडनाशके फवारताना विषबाधेचा प्रतिबंध करण्याकरता सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा व सुरक्षा किट वापरूनच फवारणी करावी.

 

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Be aware of pink bollworm on cotton and take measures as needed Published on: 05 August 2022, 08:02 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters