फवारणी करत असतांना शेतकऱ्यांकडून अनावधानाने हलगर्जीपणा केला जातो पण याच हलगर्जपणामुळे कित्येकवेळा शेतकऱ्याच्या जीवावर बेतते व याप्रकारच्या घटनाही कानावर येतात. यावर पुढाकार घेता डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि महाविद्यालय,अकोला येथील
अंतिम वर्षातील विद्यार्थी सागर दाढे,निखिल चक्रनारायन,ऋषिकेश चव्हाण यांनी RAWE & AIA कार्यक्रमाअंतर्गत,फवारणी करतांना कीटकनाशक, बुरशीनाशक इतर कृषि निगडित औषधींचा वापर करतांना कशा प्रकारे दक्षता घेता येईल याचे सादरीकरण केले आहे.A presentation has been made on how vigilance can be taken.अकोला तालुक्यातील कान्हेरी
सरप या गावात श्री सचिन गाईगोळ यांचा शेतात द्रावण तयार करतांना व तसेच या औषधी कृषि सेवा केंद्रावरून आणण्यापासून ते रीकाम्या डब्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत कश्या प्रकारे दक्षता घ्यावी व तसेच फवारणी किटचा वापर योग्यप्रकारे कसा
करावा व फायदे, यावर सादरीकरण व स्पष्टीकरण दिले.या दरम्यान सादरीकरणाला श्री सरप काका, श्री.श्रीकृष्ण ठोंबरे , सचिन गाईगोल, ध्यानेश्वर ठोंबरे ,सुशीला ठाकरे व अन्य महिलाही उपस्थित होत्या.
कृषि विज्ञान केंद्र,अकोलाचे प्रमुख डॉ. ठाकरे सर, श्री. तुपकर सर व कार्यक्रम अधिकारी श्री. संजय कोकाटे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
Share your comments