1. कृषीपीडिया

शेती आणि एकत्रित कुटुंब पद्धती.

शेती आणि एकत्रित कुटुंब पद्धती.हा विरोधाभास किती भयंकर आहे ना कि ज्या देशाची लोकसंख्या जगात सर्वाधिक होणार आहे किंवा सर्व द्वीतीय आहे त्या देशात शेती मजूर न मिळणे ही पण एक समस्या आहे. शे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेती आणि एकत्रित कुटुंब पद्धती.

शेती आणि एकत्रित कुटुंब पद्धती.

शेती मजूर, शेतीचे तुकडे, शेतीतील रस्त्यांचे प्रश्न असे एक ना अनेक प्रश्न हे विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत.

एक उदाहरण पाहू. माझ्या ओळखीच्या एका आजोबांकडे ३० एकर जमीन होती. त्यांना ६ मूल आहेत. हे एकत्र कुटुंब शेती कसायचे तेंव्हा यांच्याकडे ४ बैल,३ म्हैस, ४ गाई, २ लावणीचे गोरे आणि ५ वासरे आणि २५-५० कोंबड्या अशी जनावरे होती. शेतीच्या सर्व निविष्ठा एकत्र खरेदी व्हायची.शेतीची सर्व अवजारे ठेवणे शक्य होते. ३०एकर पैकी किमान २ एकर क्षेत्रावर चारा पिकांचे क्षेत्र असायचे. ओढे-नाले मोठे होते. बिगर हंगामात त्यांच्या ६ पैकी ४ मुले पुण्यात मार्केट यार्डला कामाला जायचे आणि कुटुंबाला आर्थिक उत्पन्न अधिक मिळवता याचे.

पुढे जगरहाटी प्रमाणे हे कुटुंब विभक्त झाले. प्रतेकी ५ एकर जमीन आली. बैल ठेवणे कोना एकाला शक्य न्हवते व गरजेपेक्षा जास्त होते म्हणून ते विकण्यात आले. यातून शेतीला मिळणारा अमूल्य सेंद्रिय खतांचा साठा लोप पावला.प्रतेकाला एक खताची गोणी आणायची असेल तरी प्रतेकजन वेगवेगळा जायला लागला.औजारे भाड्यावर घ्यावी लागायला लागली. ओढे-नाले जमीन काढण्यासाठी अधिक छोटे झाले, चारा पिकांपेक्षा नगदी पिकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. काहीजण पूर्णवेळ शेती करायला लागले टतर काहींनी शेती विकून पूर्णवेळ वेठबिगार कामगार झाले. उत्पादन खर्चातील मनुष्य दिवस वाढले. हे सर्व फक्त विभक्त कुटुंब पद्धतीमुळे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वमाऊलींनी पसायदानात म्हंटलेच आहे की ‘विश्वची माझे घर’ म्हणजे विश्वालाच एक कुटुंब मानले. काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्याही बदलत गेली. एकत्रित कुटुंबातून संयुक्त कुटुंबेही अस्तित्त्वात आली असे आपल्याला वेळोवेळी समाजात वावरतांना जाणवते. अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्याचीही त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते. ‘

विश्वची माझे घर’ या संकल्पने नुसार जगातील एकत्रित कुटुंबावर जेंव्हा एखादी नैसर्गिक किंवा मानवा निर्मित आपत्ती कोसळते तेंव्हा त्यांना वसुंधरेवरील इतर कुटुंबं सदस्यांनी दिलेल किंवा केलेली सहाय्य किंवा मदत म्हणजे रक्ताच्या नात्यांपलिकडेही प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्यातील मानवतेच्या कुटुंबाला जिद्दीने आणि ताठ मानेने जगण्यास शिकविणारे परमेश्वराचे प्रेषकच म्हणावे लागतील.

घरातील स्त्रीया कामानिमित्त बाहेर गेल्या असतील तर अन्य महिलांच्या मदतीमुळे कुटुंबात किंवा घरात अडचणी येत नसत. मुलांनाही मोठय़ा कुटुंबात राहण्याची सवय लागे. सण-समारंभ एकमेकांच्या मदतीने उत्साहात साजरे करता येत होते. हे सगळे एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे आहेत. ‘एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घराला कधीच कुलूप लावले जाते नसे. त्यामुळे तुम्ही कधीही घरी या, तुमच्या दिमतीला कायम कोणी ना कोणी हजर असायचे.

उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावयाचा असेल तर ह्या तुकड्या-तुकड्याच्या शेतीत करू शकत नाही. उत्पादनात घट होत आहे अल्पभूधारक शेतकर्‍यांपुढे अडचणींचा डोंगर उभा आहे. ’ना आडात ना विहिरीत’ अशी अवस्था झाली आहे. पिकावरील उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव यांचा कुठे ताळमेळ बसत नाही.आज राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती कसण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मनुष्यबळाच्या भरवशावरच शेती केल्या जाते. परिणामी पिकांची लागवड वेळेवर होत नसल्याने उत्पादनात कमालीची घट येत होती.

महाराष्ट्रातील सहकार चळवळीने प्राप्त केलेले यश बघून सहकार चळवळीच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे बचतगट स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार राज्यभर शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले.शेतीच्या कामांसाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत. जमिनीच्या लहान तुकड्यामुळे शेती फायदेशीर ठरत नाही. अशा परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुहिक शेतीचा प्रयोग करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. हे म्हणजे घरच्यांवर विश्वास नाही आणि जगात समविचारी शोधण्याचा प्रयत्न करणे होय.

विभक्त कुटुंब पद्धती निर्माण होण्याचे मूळ कारण अविश्वास, स्वताचा विकास साधण्यसाठी प्रयत्न करणे हा आहे. सध्या आपण हेच साध्य करण्यासाठी गट शेती करतोय म्हणजे आपण आपल्यानं पासून विभक्त होवून इतरां सोबत मिळून आपण सामूहिक निर्णय,सामूहिक प्रयत्न, सामूहिक दृष्टीकोण हे करण्याचा प्रयत्न करतोय.हेच सर्व आपण एकत्र कुटुंब पद्धतीत अवलंबले तर विकासाचा वेग नक्कीच अधिक होईल. या सर्व बाबी लक्षात घेवून वर्ष २०१४ हे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक अन्न व कृषि परिषदे मार्फत “ कौटुंबिक शेतीचे जागतिक वर्ष” म्हणून साजरे करण्यात आले.

यात कुटुंब शेती महत्वाचे असण्याचे प्रमुख कारणे अशी देण्यात आली.

कुटुंब शेतीनेच जागतिक अन्न सुरक्षा साध्य करता येईल.

कुटुंब शेतीच्या माध्यमातूनच पारंपारिक अन्न पदार्थ जतन करता येतील, यातूनच जागतिक कृषि जैवविविधता टिकवता येईल. जगभरात बॅलेन्स्ड डाएट सूरीक्षता निर्माण करता येईल. कुटुंब शेतीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारू शकते.यातून सामाजिक सुरक्षितता निर्माण करता येवू शकते. इत्यादि वेळ काढून याचा अहवाल नक्की वाचा, या बाबत अधिक विचार करण्याची व कृती करण्याची आवश्यकता आहे.

 

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

९९२३१३२२३३

English Summary: Agriculture mix families method Published on: 04 January 2022, 06:02 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters