
आजकालच्या स्पर्धात्मक युगात शेती ही केवळ पोटभरायच साधन राहिलेली नाही, तर ती एक व्यवसायिक गोष्ट बनली आहे. पण दुर्दैवाने बरेच शेतकरी आजही शेतीकडे व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहत नाहीत. नफा-तोट्याचा हिशोब न ठेवल्याने नुकसान झाल्यावर कारण समजत नाही आणि नफा झाला तरी त्याचा योग्य वापर करता येत नाही.

संपूर्ण हंगामाचा (खरीफ/ रब्बी) खर्च समजून घ्या
शेती करत असताना फक्त उत्पन्नाचा विचार न करता खालील सर्व खर्च लक्षात घेणे आवश्यक आहे:
जमीन तयार करणे – ट्रॅक्टर भाडे, रोटावेटर, मशागत
बी-बियाणे – किंमत, पेरणी खर्च
खत व औषधे – रासायनिक व सेंद्रिय
मजुरी – लागवड, खुरपणी, फवारणी, कापणी
पाणी – विहीर, मोटार, सिंचन
वाहतूक व मार्केट खर्च
नफा-तोटा समजून घ्या
तुम्हाला प्रत्येक हंगामानंतर एवढं विचारायला हवं –
"या हंगामात मी एकूण किती खर्च केला? आणि विक्रीतून मला किती पैसे मिळाले?"
जर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असेल, तर ते का झाले हे शोधा. हवामान, दर, पिकनिवड – हे सर्व घटक अभ्यासा.
शेतीमध्ये व्यवसायिक दृष्टिकोन का हवा?
व्यवसायिक शेतकरी खर्च वाचवतो
नुकसान टाळण्यासाठी योजना आखतो
मार्केटचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री करतो
कर्ज न घेता साठवलेली रक्कम वापरतो
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो
शेतकऱ्यांनी ही घ्यावी टेक्नोलॉजीची मदत
आज मोबाईलमध्ये शेतीसाठी अनेक अॅप्स आहेत –📲
खर्च व नफा नोंदवण्यासाठी
हवामान अंदाज
बाजारभाव माहिती
कीड नियंत्रण मार्गदर्शन
सरकारची भूमिका व शेतकऱ्यांची अपेक्षा
सरकार दरवेळी निवडणुकीपूर्वी अनेक योजना जाहीर करते. पण त्या किती अंमलात येतात? शेतकऱ्यांनीही आता ‘जाणीवपूर्वक मत’ द्यायला हवं. हक्क मागा, भीक नाही.
रेकॉर्ड ठेवा – प्रगतीचा आरसा
तुमच्या प्रत्येक पिकाचा खर्च आणि विक्रीचा रेकॉर्ड ठेवा.
एक वही ठेवा – "माझी शेती वही"📝
दर महिन्याला हिशोब लिहा – पाणी, औषधे, मजुरी, उत्पन्न
दर वर्षांनी हा डेटा पाहून तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता.
तात्पर्य – विचार बदला, परिणाम बदलेल!
शेती हा व्यवसाय आहे हे मनात ठेवा. तुमच्या मेहनतीला आर्थिक मूल्य मिळालं पाहिजे. तुम्ही स्वतःच शेतातील ‘सीईओ’ आहात.💺💼
हिशोब ठेवा, तंत्रज्ञान वापरा, आणि नफा वाढवा!
मनीष राजेश मेश्राम
७७०९३२१८७६
अमरावती, महाराष्ट्र
Share your comments