हा विषय कृषी क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा असून कृषी शिक्षणामुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडू शकते. याचे खूप मोठे उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत जसे की कृषी पदवीधर शिक्षण घेऊन शेतीमध्ये त्याच्या कृषी शिक्षणाचा वापर करून व तंत्रज्ञानाचा वापर करून तो शेतीमध्ये नावलौकिक करतो.
माझा अनुभव - मी कृषी क्षेत्रात पदवी घेत असताना आणि त्यातच कृषी पत्रकारिता करत असताना शेतकऱ्यांचा समूहांमध्ये जाऊन किंवा शेताच्या बांधावर जाऊन जेव्हा मी त्यांची शेती करण्याची पद्धत जेव्हा बघतो तेव्हा खरंच माझ्या मनाला वाटते की शेतीसाठी कृषी शिक्षणाची नितांत गरज आहे. मला असे आढळून आले आहे की शेतकऱ्यांना शेतीच्या मूलभूत गरजा, जैविक खते, शेतीसाठी लागणाऱ्या 70 टक्के निविष्ठा घरच्या घरीच बनवू शकतो हेही माहिती नसल्याने असे वाटते की कृषी क्षेत्राला शिक्षणाची गरज आहेच आहे.
कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना त्याची मूलभूत माहिती ,पारंपारिक व्यवसाय, नवनवीन तंत्रज्ञान या सगळ्यांची माहिती असणे गरजेचे असते परंतु शेतीमध्ये थोडा वेगळा प्रकार आहे.शेतीमध्ये पारंपारिक शेतीची जोड घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागतो, शेती क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास आणि दररोज वातावरणात आणि मातीत होणारे बदल आणि त्यामुळे पिकात होणारे बदल यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो, हे अनुभवावे लागतात त्यामुळे त्या सर्वांचा सामना रोजच्या रोज करावा लागतो तो कोणत्या पद्धतीने करावा, कसा करावा, याची माहिती फक्त आपल्याला कृषी शिक्षण घेतल्यामुळे किंवा शेतीविषयक ज्ञान प्राप्त केल्यावरच आपण कृषी क्षेत्रात आणि शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकतो.शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान ची जोड मिळाली तर. शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची शेती व शेतीपूरक तंत्र विकसित करणे महत्त्वाचे भुमिका बजावता येते. तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व शास्त्रीय माहिती महत्त्वाची असते. शेती व्यवसाय हा शास्त्र आणि कला व कौशल्य यावर आधारीत आहे.
आपल्या जमिनीत असणारे वनस्पती साठी लागणारे अन्नघटक यावर उत्पादन अवलंबून असते.कृषी शिक्षणामुळे शेती मधे खते देताना उपलब्ध घटकाचे प्रमाण लक्षात घेऊन पिकांना आवश्यक ते घटक कीर्ती प्रमाणात दिले पाहिजे हे अभ्यासाद्वारे समजून शकतो. त्या मधे जमिनीच्या प्रकाराचा अभ्यास करून पीक नियोजन करणे गरजेचे आहे. पिकांना लागणाऱ्या पाण्याची गरज अभ्यासून पिकांना पाणी देणे गरजेचे असते. पिकावर येणाऱ्या कीड व रोग याचा पिकावर दिसणारी लक्षणे पाहून त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींसाठी कृषी शिक्षण या संबंधीचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी कृषिविषयी शिक्षण घेण्याची गरज आहे. त्यामुळे शेती उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल.आज कृषी शिक्षण गरजेचे का?
आज शासनही कृषी शिक्षणाविषयी विचार करतआहे. त्याच प्रमाणे राज्यात कृषी विकासाला खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उपलब्ध मनुष्यबळ आणि औद्योगिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज यामध्ये सध्या अंतर वाढत असल्याचे दिसून येत असल्याने आज विद्यार्थी वर्ग कृषी क्षेत्राकडे आकर्षित होत आहे.
कृषी शिक्षणानंतर मुख्यत्वे पदवी, पदव्युत्तर तसेच पीएचडी पदवीनंतर संपूर्ण जगामध्ये व आपल्या देशातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था, शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठे, केंद्रीय व राज्यस्तरीय कृषी व संलग्न विभाग, कृषी विषयक बी-बियाणे, खते, औषधे संबंधीच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या, कृषी प्रक्रिया उद्योग, कंपन्या, निर्यात, बॅंका, स्वयंसेवी व खासगी संस्था या व अशा विविध क्षेत्रामध्ये कृषी-शिक्षनाचे कुशल मनुष्यबळ गरजेचे आहे. याचबरोबर कृषी शिक्षणाला वेगळे महत्त्व दिले जात आहे.राज्यात कृषी शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणाच्या संधी देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. कृषी शिक्षण हे व्यावसायिक असल्यामुळे शेतीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील या शिक्षणाचा उपयोग होतो.
Share your comments