मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. बाजारपेठ कितीही सजवली तरी उपयोग नाही. म्हणजेच, शेती आणि व्यवसायावर उपजीविका करणारे लोक अर्थव्यवस्थेचा कणा आहे “शेतीतले कमी उत्पन्न, कमीनफा, जमीन धारणेतली घट या कारणांस्तव ग्रामीण भागातले युवा वर्ग उदरनिर्वाहासाठी शेती नसलेल्या व्यवसायांकडे वळत आहेत हे आपल्याला मान्य करावे लागेल.नवयुवक तोटपुंज्या नौकरी साठी शहरांकडे धाव घेत आहेत.शेतीची आर्थिक आणि आजची शिक्षित, प्रगत, ग्रामीण तरुणाई शेतीकडे कसे पहातात? शेतीतून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसल्याचे सर्व शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची खुप शेतकऱ्यांमध्ये ही भावना आढळून आली. खुप शेतकरयांना आपल्या मुलांना शेती या क्षेत्राकडे वळवायचे नाही.शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय करण्यासाठी तयार आहे.
आज शेतीची उपेक्षा होतआहे आणि त्यामुळे शेती फायद्याची कधीच ठरली नाही. परिणामस्वरूप नवयुवक शेतीकडे आकर्षित होतच नाही. पूर्वी शेती’ हे तरुणांचे आकर्षणकेंद्र होती परंतु आपल्या शेतकऱ्यांची मुलेही शेतीकडे सध्या आकर्षित होत नाहीत
शेती हेच करिअर निवडून कष्ट करणाऱ्या तरुणांना त्यातून काहीही मिळत नाही. शेतकरी तरुणाशी लग्नासही मुली तयार नसतात, इतकी शेती दुय्यम होत चालली आहे. त्यामुळे रोजगार म्हणून शेतीचा स्वीकार तरुणांनी करावा अशी स्थिती राहिलेली नाही. तरुणही रोजगारासाठी अन्य क्षेत्रांमध्ये जाण्यास प्रवृत्त होतात. या सर्व कारणांमुळे तरुणांना शेतीशी जोडण्याची कल्पना केवळ स्वप्नवतच ठरेल, यात शंका नाही.
आता आपल्या नवं तरुणांना विचार बदलावे लागेल.शेती क्षेत्रामध्ये रोजगाराच्या प्रचंड शक्यता दडलेल्या आहेत. हे लक्षात घेतल्यास तरुणांमध्ये शेतीबाबतची प्रतिमा मुळापासून बदलली जाऊ शकते.
शेतीकडेही व्यावसायिक दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. आपल्याला हे क्षेत्र मजबूत करण्यासाठी अधिक भर दिला पाहिजे. सुधारित तंत्रज्ञान, सुधारित पद्धती इ. गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.कृषी क्षेत्रात तरुणांचा सहभाग वाढावा, असे खरोखर वाटत असेल, तर त्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत.
सर्वप्रथम शेती क्षेत्राशी निगडित तरुणांना शेती ला अनुसरून उद्योग करावे लागेल आणि त्यांना अन्य क्षेत्रांची वाट धरावी लागणार नाही.शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जेणेकरून कृषी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांना भविष्याची शाश्वती वाटू लागेल. रोजगाराची निर्मिती करण्याचे काही अन्यही मार्ग उपलब्ध करावे लागतील. कृषितंत्रच सुधारेल असे नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च पदांवर सेवा करण्याचे स्वप्न साकार करता येईल.
शेती आणि शेतकऱ्यांची सद्यःस्थिती पाहता तरुणांना व्यावहारिक ज्ञान देऊ शकेल, असे बाजाराधिष्ठित शिक्षण देण्याचीही गरज आहे. जमीन, पाणी याबरोबरच थोडी गुंतवणूक करून खाद्यपदार्थ निर्मिती करण्याचे प्रशिक्षण त्यांना द्यावे लागेल. शेतीवर अवलंबून राहू पाहणाऱ्यांसाठी शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरावा.प्रत्येक तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे
आपल्या जगण्याचा मूलाधार असलेल्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील हे निश्चित.
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल.
Share your comments