1. कृषीपीडिया

कृषी सल्ला निंबोळी अर्क बनवण्या आणि वापरण्यासाठीचा

शेतकरी मित्रांनो,आपली पूर्वहंगामी कापुस लागवड झाली

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषी सल्ला निंबोळी अर्क बनवण्या आणि वापरण्यासाठीचा

कृषी सल्ला निंबोळी अर्क बनवण्या आणि वापरण्यासाठीचा

शेतकरी मित्रांनो,आपली पूर्वहंगामी कापुस लागवड झाली असेल किंवा बरेच जण येत्या मासूनच्या पावसाच्या पाण्यावर करणार असतील. आपण सर्वजण जाणतातच की कापसाला कीड संरक्षणासाठी बराच खर्च येत असतो, त्यासाठी महत्वाचे,चांगल्या कापुस उत्पादना साठी कापुस पीक संरक्षण महत्वाचे आहे. पण फक्त रासायनिक

किटकनाशकांनीच कीड नियंत्रण होत नाही, यासाठी काही जैविक/सेंद्रिय औषधांचा उपयोग केला जातो. यासाठी आपण निमार्क घरी तयार करू शकतो.For this we can prepare Nimark at home. त्यासाठी आपल्या बांधावर तसेच रस्त्यावर अनेक निंब (कडूलिंबाची ) झाडे असतात. याच्या निंबोळया आता पक्व होऊन जमीनीवर पडत आहेत त्या

आपणास फक्त गोळा करुन सुकवून ठेवायच्या आहेत. त्याचा वापर निमार्क तयार करण्यासाठी करता येईल.या वाळलेल्या निंबोळ्यापासून निमार्क तयार करण्यासाठी-1 किलो निंबोळया घ्याव्या व घरगुती वापराचे मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकुन फिरवुन चांगली पेस्ट तयार करावी.व ती पेस्ट 10 लीटर पाण्यात टाकावी,त्यात 100 ग्रॅम वाशिंग पावडर टाकावी व चांगले ढवळून हयावे. 

आपण ज्याही काही रासायनीक किट्कनाशकांचा फवारणीसाठी वापर करणार त्यात हे घरगुती निमार्क विभागून/ मिसळून फवारणीसाठी वापरले तरी चालते.निमार्क चे फायदे.- 1) यामुळे रासायनिक किटकनाशकाची क्रियाशीलता वाढते.2) यामुळे दोन फवारणीतील अंतर वाढते.3) निमार्क हे अॅन्टी रिपेलंट म्हणून काम करते.

म्हणजे ते किटकांना परतविते यामुळे कीटक पिकावर हल्ला/अॅटॅक करत नाही.4) निमार्क हे अॅन्टीफिडंट म्हणूनही काम करते. म्हणजे ते कीटकांना पीक खाण्यापासुन परावृत्त करते/रोखते.निमार्क हे कीटकांना नपुंसक बनविते यामुळे कीटकांची पुढाची 

पिढी तयार होत नाही यामुळे आपले पीक सुरक्षितराहते.यासाठी आपल्या घराजवळील,शेताजवळीलअल्प मोली बहुगुनीनिंबोळी वापरा व आपला उत्पादन खर्च कमी करा आणि उत्पादनही वाढवा.महत्वाचे म्हणजे, हे निंबोळी अर्क प्रत्येक फवारणीत नक्की वापरा.

 

प्रा.दिलीप शिंदे सर

9822305282

English Summary: Agricultural advice on preparation and use of nimboli extract Published on: 04 August 2022, 02:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters