अतीवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या हाताला आलेल्या कापसाला प्रती क्विंटल १३ हजार रुपये तर सोयाबीनला प्रती क्विंटल ९ हजार रुपये भाव मिळवून घेण्यासाठी मा.खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात राज्यव्यापी आंदोलनाच्या पुर्वनियोजनासाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात दि.२८ ऑक्टोबर रोजी अकोली बु.येथुन शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. राजकीय झुंडशाहीने राज्यात चालु केलेले सत्तांतर,
मंत्रीपद आणि आता चिन्ह वाटपासाठी केलेला संघर्ष हा शेतकऱ्यांना प्रचंड त्रासदायक ठरला आहे.The struggle for the ministerial post and now the allotment of symbols has become a lot of trouble for the farmers.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2022 जळगाव जाणून घ्या कधी, काय आहे खास?
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटी, आणि सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे कापूस सोयाबीन उडीद मूग ज्वारी मका इत्यादी शेतातील पिकांचे झालेले नुकसान कधिही भरून निघणारे नाही. असे असतांना स्वाभिमानीने वेळोवेळी आंदोलने करून देखील सरकारने जाणिवपूर्वक
शेतकऱ्यांना नुकसानीची मदत दिली नाही. आतातरी सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. विमा कंपनीने विना अट पिक विमा मंजुर करावा. शेतमजुरांसाठी राज्यसरकारने स्वतंत्र शेतमजुर कल्याण महामंडळ स्थापन करून मंडळअंतर्गत सर्व सवलती सह मजुरांना दरमहा ४ हजार रु मानधन लागु करा. अशा मागण्या स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी संवाद सभेत
बोलतांना केल्या. तसेच अतीवृष्टिच्या संकटातून शेतकऱ्यांच्या थोडे फार हाताला आलेल्या कापसला प्रती क्विंटल १३ हजार रु. सोयाबीनला प्रती किंव्टल ९ हजार रुपये भाव मिळवुन घेण्यासाठी सरकार विरोधात लवकरच राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी जण आंदोलन या विदर्भातुन सूरु करणार असल्याचा ईशारा प्रशांत डिक्कर यांनी या सभेत बोलतांना दिला.यावेळी स्वाभिमानीचे अनंता मानकर, उज्वल पाटील चोपडे, उज्वल खराटे,विजय ठाकरे, विशाल चोपडे, गजानन रावनकार, संतोष दाणे, सह स्वाभिमानीचे बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..
Share your comments