व्यवसाय म्हटले म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतात. परंतु कुठलाही व्यवसाय करताना आपण स्थापन करत असलेल्या ठिकाणी कोणत्या गोष्टींना मागणी आहे कोणत्या स्वरूपाची व्यवसाय चांगले पीक करू शकतात अशा व्यवसायाची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारपेठेचे जर मोठेगाव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या हॉटेल सुरू करू शकता किंवा वडा-पाव किंवा भजी स्टॉल यासारखे व्यवसाय देखील चांगले चालू शकतात.
परंतु या व्यतिरिक्त आपण बाजारपेठेचे गाव असेल तर कोणते व्यवसाय चांगले चालू शकतात, तर अशा व्यवसायांची माहिती घेऊ.
ग्रामीण भागात बाजारपेठेचे गाव असेल तर चांगले चालणारे व्यवसाय
1- किराणा मालाचे दुकान- या व्यवसायाच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवणे शक्य आहे. हा व्यवसाय व्यवस्थित नियोजन करून उभारला तर कमी कालावधीत चांगला चालू शकतो. त्यासोबतच एखाद्या जनरल स्टोअर्स किंवा घरगुती वापराचे वस्तूंचे दुकान देखील सुरू करता येते.
यासोबतच शेतीला आवश्यक असलेल्या अवजारांचे दुकान हा एक चांगला ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही फुटवेअर, विविध खेळण्यांची दुकाने किंवा कॉस्मेटिक चे स्टॉल यासारखे व्यवसायाच्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा अशा ठिकाणी कमवू शकतात.
नक्की वाचा:Business Tips: स्वतःचा ब्रँड निर्माण करा आणि दुधापासून बनवा 'हे'पदार्थ आणि कमवा भरपूर नफा
2- भाजीपाला व फळांची विक्री- एखाद्या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्ही स्टॉल उभारून भाजीपाला किंवा फळांची विक्री करू शकतात किंवा एखादे वाहन विकत घेऊन या वाहनाच्या माध्यमातून तुम्ही गावात जाऊन किंवा दुसऱ्या गावांच्या आठवडे बाजारात जाऊन देखील भाजीपाला व फळे विक्रीचा व्यवसाय करू शकतात.
आठवड्यातून पाच दिवस जरी व्यवसाय केला तरी या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला भाजीपाला व फळे स्थानिक परिसरातूनच किंवा मार्केटमधून उपलब्ध होऊ शकतात.
3- बेकरी प्रोडक्ट- तालुक्याच्या ठिकाणी जर मोठी बेकरी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही होलसेल मध्ये माल विकत घेऊन तो स्थानिक बाजारपेठेत विकू शकतात.
बेकरी उत्पादनांना देखील मोठी बाजारपेठ आहे. आपल्याला माहित आहेच कि या अंतर्गत पाव, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्किट इत्यादी पदार्थ या अंतर्गत विकले जातात.
4- इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री व दुरुस्ती-इलेक्ट्रॉनिक वस्तूना देखील चांगली मागणी असल्यामुळे तुम्ही टीव्ही, मोबाईल, पंखे तसेच रेफ्रिजरेटर सारख्या वस्तू रिपेरिंग करण्याचा कोर्स करून अशा वस्तू रिपेरिंग करण्याचे स्टॉल टाकू शकतात.
Share your comments