1. कृषी व्यवसाय

Superb Bussiness: शेतकरी बंधूंनो! अगदी कमी गुंतवणुकीत सुरु करा लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग, वाचा माहिती

शेतमालावर प्रक्रिया उद्योगामध्ये विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग येतात जसे की टोमॅटो प्रक्रिया उद्योग, बटाटा प्रक्रिया उद्योग असे बर्याच प्रकारचे उद्योग यामध्ये येतात. शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये अनेक तरुण यशस्वी झाले असून त्यांनी आर्थिक उन्नती देखील केली आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये एक वेगळा उद्योग म्हणजे लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती करण्याचा उद्योग होय.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
laakdi ghana

laakdi ghana

शेतमालावर प्रक्रिया उद्योगामध्ये विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग येतात जसे की टोमॅटो प्रक्रिया उद्योग, बटाटा प्रक्रिया उद्योग असे बर्‍याच प्रकारचे उद्योग यामध्ये येतात. शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये अनेक तरुण यशस्वी झाले असून त्यांनी आर्थिक उन्नती देखील केली आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये एक वेगळा उद्योग म्हणजे लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती करण्याचा उद्योग होय.

हा उद्योग  शेतकरी बांधवासाठी खूप फायद्याचा व सोनेरी संधी असणारा उद्योग ठरू शकतो. हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला याची पुरेशी माहिती व योग्य व्यवस्थापन केले तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

नक्की वाचा:Agri Bussiness: कोंबडी खाद्याचा व्यवसाय करा आणि मिळवा दुप्पट नफा,वाचा सविस्तर माहिती

 हा उद्योग का करावा?

 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला खूप काही गुंतवणूक करण्याची गरज नाही. म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा याच्या एकंदरीत बाजारपेठेचा विचार केला तर गुंतवणूक कमी व नफ्याचे प्रमाण जास्त अशा प्रकारचा उद्योग आहे.

शेतकरी बांधवखूप चांगल्या पद्धतीने हा उद्योग करू शकतात व महिलावर्ग देखील या उद्योगाच्या माध्यमातून पुढे येऊ शकतात. विशेष म्हणजे तुम्ही तुमची नोकरी किंवा एखादा दुसरा व्यवसाय असेल करतो सांभाळून देखील एक साइड बिझनेस म्हणून हा उद्योग चांगल्या पद्धतीने करू शकतात.

स्मॉल स्केलवर कसा सुरु करावा?

 तुम्ही हा व्यवसाय अगदी छोटासा गाळा घेऊन देखील स्मॉल स्केलवर म्हणजे छोट्या पद्धतीने सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही गाळ्याच्या मागच्या भागात एक प्रोडक्शन युनिट आणि समोर तुमचं विक्री युनिट अर्थात सेलिंग युनिट उभारू शकतात.

फक्त या उद्योगाचे प्रमोशन आणि मार्केटिंग तुम्हाला खूप जबरदस्त पद्धतीने करावी लागेल. या उद्योगाचे एक मार्केटींग तुम्ही वरकाऊट केली तर तुमचा एक बेसिक फार्मूला तयार होतो तुम्हाला नक्की कसे पुढे जायचे आहे हे डेफिनेटली कळते. तुमचे उत्पादन प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे

या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखाद्या छोटेखानी कार्यक्रम ठेवून लोकांना बोलावून तुम्ही तुमच्या उद्योगाचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू शकतात. आता 13 किलो चा घाणा असतो यासाठी एक तास वेळ लागतो.

13 किलो शेंगदाण्याच्या घाण्यापासून सुमारे पाच ते साडेपाच किलो तेल मिळते. तसेच खोबऱ्याचा घाना 22 किलोचा असतो व त्यातून जवळपास 50 टक्के तेल निघते. यामधून तयार झालेले तेल मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते व यात तेलामधील असणारे कण खाली स्थिर होतात व चांगले असणारे तेल आपल्याला वरील बाजूला मिळते.

नक्की वाचा:Agri Bussiness:स्वतःचा 'डाळ मिल उद्योग' उभारा आणि मिळवा आर्थिक समृद्धी,वाचा माहिती

या उद्योगा विषयी थोडक्यात

1- लागणारे भांडवल- कमीत कमी दोन लाख रुपये

2- लागणारा कच्चामाल-सूर्यफूल,शेंगदाणा,तेल स्टोरेज करण्यासाठी टाकी आणि पॅकिंगसाठी बॉटल्स आवश्यक

3- लागणारी यंत्रसामग्री- 3 एचपी चा मोटार घाना

4- यंत्रसामग्रीचे किंमत- एक लाख 37 हजार रुपयांचा घाना मिळतो.

5- लागणारे मनुष्यबळ- साधारणपणे दोन किंवा तीन व्यक्तींची आवश्यकता भासते.

6- विक्री कुठे करावी?- तुम्ही तुमचे तयार तेल आजूबाजूचं किराणा दुकानांमध्ये विकू शकता किंवा मोठे मोठे मॉल्सला सुद्धा तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकतात.

नक्की वाचा:Agri Releted Bussiness: 3 लाख रुपये गुंतवून सुरु करा 'कांदा गोणी' बनवण्याचा व्यवसाय, मिळेल चांगला नफा

English Summary: making edibekl oil by wood mill bussiness is so profitable and give more income Published on: 17 September 2022, 02:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters