1. कृषी व्यवसाय

Business Tips: स्वतःचा ब्रँड निर्माण करा आणि दुधापासून बनवा 'हे'पदार्थ आणि कमवा भरपूर नफा

आपण दररोज बऱ्याच लेखांच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेत असतो.जसे शेतमालावर प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरतात. तसेच दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व त्यांची विक्री हा व्यवसाय देखील खूप चांगला आर्थिक नफा देणारा ठरू शकतो. आपल्याला माहित आहेच कि बाजारपेठेमध्ये दूध आणि दुधापासून तयार पदार्थांना खूपच मागणी आहे आणि ही मागणी वर्षभर असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
milk processing bussiness

milk processing bussiness

आपण दररोज बऱ्याच लेखांच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेत असतो.जसे शेतमालावर प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरतात. तसेच दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व त्यांची विक्री हा व्यवसाय देखील खूप चांगला आर्थिक नफा देणारा ठरू शकतो. आपल्याला माहित आहेच कि बाजारपेठेमध्ये दूध आणि दुधापासून तयार पदार्थांना खूपच मागणी आहे आणि ही मागणी वर्षभर असते.

त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये स्वतःचा एक ब्रँड तयार करून जर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री व्यवस्था उभारली तर नक्कीच हा व्यवसाय तुम्हाला एक चांगली आर्थिक समृद्धी देऊ शकतो. त्यामुळे या लेखात आपण अशाच दुधापासून तयार केल्या जाणार्‍या काही पदार्थांची माहिती घेऊ. जेणेकरून अशा पदार्थांच्या विक्रीतून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

नक्की वाचा:Bussiness Idea: 'आईस फॅक्टरी' उभारा आणि मिळवा उत्कृष्ट नफा, वाचा सविस्तर माहिती

 दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग

1- कुल्फी- आता कुल्फी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या आवडीचा असतो हे देखील आपल्याला माहिती असून उन्हाळ्यामध्ये खूप मागणी असते.

तसे पाहायला गेले तर कमी अधिक प्रमाणात संपूर्ण वर्षभर कुल्फीला मागणी असते. जर तुम्हाला कुल्फी तयार करायचे असेल तर यासाठी चार टक्के फॅट असणारे दूध घेणे गरजेचे असते व त्यामध्ये सहा टक्के साखर, स्टेबलाइजर आणि ईमल्सीफायर झिरो पॉईंट पाच टक्के टाकून आपल्याला दूध पाश्‍चराईज्ड करायचे असते.

हे दूध 80 टक्के तापमानापर्यंत गरम करून त्यानंतर तुम्हाला ते थंड करून ठेवायचे आहे व 15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत त्यामध्ये रंग व सुगंध टाकणे व त्याबरोबर फ्रीजिंग करणे इत्यादी प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही कुल्फी बनवू शकतात.

2- कलाकंद- तुम्ही दुधापासून कलाकंद तयार करून चांगली विक्री करू शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रथमतः दूध चांगले उकळून घ्यावे लागते व दूध अर्धे आटल्यानंतर त्यामध्ये सायट्रिक ऍसिड टाकावे व त्यानंतर दूध परत चांगले ढवळून घ्यायचे आहे.

त्यानंतर दूध थोड्या प्रमाणात आणखी आटले की त्यामध्ये सात टक्के साखर टाकायची आहे व नंतर ते हलवत राहायचे आहे. जेव्हा याचे घट्ट ओलसर असे गोळे तयार होतात त्यावेळी त्याला खाली घ्यायचे व तूप पसरलेल्या भांड्यात काढून घ्यायचे असते व अशा पद्धतीने तुम्ही कलाकंद बनवू शकतात.

नक्की वाचा:Agri Bussiness:स्वतःचा 'डाळ मिल उद्योग' उभारा आणि मिळवा आर्थिक समृद्धी,वाचा माहिती

 दुग्धजन्य पदार्थ उद्योग थोडक्यात

1- लागणारे भांडवल- हा उद्योग तुम्ही एक ते दीड लाख रुपये भांडवल टाकून सुरू करू शकतात.

2- लागणारा कच्चामाल- या उद्योगासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा कच्चामाल म्हणजे दूध हे लागते व त्यासोबत इतर काही गोष्टी लागतात. तसेच तुम्हाला दूध हे तुम्ही राहतात त्या ठिकाणाहून आरामात मिळू शकते.

3- लागणारी यंत्रसामग्री- दुग्धजन्य निर्मिती उद्योगांमध्ये तुम्हाला खवा बनवायचा असेल तर त्यासाठी यंत्राची गरज असते व त्यासोबतच फ्रीझर,फायर मशिन लागते व यांची किंमत 50 हजार ते एक लाखापर्यंत आहे.

4- लागणारे मनुष्यबळ- दुग्धजन्य निर्मिती उद्योगांमध्ये तुम्ही कमीत कमी दोन ते तीन मनुष्यबळाच्या साह्याने सुरुवात करू शकतात.

5- तयार माल कुठे विकाल?- तुम्ही तुमचा तयार माल एखाद्या बेकरीला पुरवू शकतात किंवा कुल्फी तयार केली तर ती आईस्क्रीम पार्लर ला विकू शकतात तसेच वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये ऑर्डर घेऊन तुमचा तयार माल तुम्ही भरपूर प्रमाणात पुरवू शकतात.

नक्की वाचा:Bussiness Tips: 'बटाटा वेफर्स'उद्योग देईल आर्थिक समृद्धी, वाचा सविस्तर माहिती

English Summary: milk processing bussiness is give more profit in less investment Published on: 18 September 2022, 04:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters