
onion processing
कांदा पिकाची लागवड महाराष्ट्रामध्ये कमी अधिक तर प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये होते. कांदा पिकांचा विचार केला तर कायमच भावाच्या बाबतीत अनिश्चितता असलेले हे पीक आहे. बहुतांशी बऱ्याचदा कांदा कवडीमोल दराने बाजारपेठेत घेतला जातो आणि शेतकरी बंधूंचा उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्कील होते. उत्पादनाचा विचार केला तर शेतकरी बंधू कांद्याचे भरघोस उत्पादन काढतात परंतु बाजार भावाच्या अभावाने कांदा विकून शेतकरी बंधूंना आर्थिक फटका प्रत्येक वेळेस बसतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला तर कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग शेतकरी बंधूंनी उभारणे तर नक्कीच ह्या माध्यमातून एक आर्थिक समृद्धीचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो. या लेखात आपण कांद्याचे निर्जलीकरण नेमके काय आहे किंवा यामुळे कांदा पिका पासून कसा शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो? इत्यादी बाबी जाणून घेणार आहोत.
कांदा प्रक्रिया
1- डीहायड्रेशन- या प्रक्रियेमध्ये कांद्याचे बारीक काप केले जातात व डीहायड्रेशन मशीनचा किंवा उन्हामध्ये कांद्याच्या कापांना वाढवले जाते. कांद्याच्या या वाळवलेल्या तुकड्यांना बारीक केले जाते व त्यांची पावडर तयार करून बाजारात जास्तीत जास्त किमतीला विकली जाते.
यासाठी तुम्हाला एक लाख 50 हजार ते पाच लाखांपर्यंतची भांडवल लागू शकते. यासाठी कांदा हा कच्चामाल असून ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात लागवड होतो किंवा कांदा खरेदी विक्री केंद्र जवळ आहेत अशा ठिकाणी वाहतूक खर्च कमी व्हावा या उद्देशाने हा प्रक्रिया उद्योग उभारणे फायद्याचे ठरते.
नक्की वाचा:आता खत-पाण्याविना शेती पिकणार; जादूचे गहू बियाणे लॉन्च, जाणून घ्या सविस्तर
2- लागणारी यंत्रसामग्री- हा उद्योग जर तुम्हाला स्मॉल स्केल वर चालू करायचा असेल तर कांद्याचे तुकडे करण्यासाठी कटिंग मशीन ची तर कांद्याचे काप वाळवण्यासाठी ड्रायर आणि वाळवलेल्या तुकड्यांपासून पावडर तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीनची आवश्यकता भासते.
या प्रक्रिया उद्योगातून तयार होणारा माल पॅकिंग करण्यासाठी पॅकेजिंग मशिन देखील लागते. जर यामध्ये तुम्ही स्वयंचलित यंत्रांचा वापर केला तर उत्पादन क्षमता वाढवू शकतात.
या यंत्रसामग्रीचा विचार केला तर यामध्ये सोलर ड्रायर घेण्यासाठी तुम्हाला 65 हजाराच्या पुढे खर्च येऊ शकतो तर ग्राइंडर मशीन हे 8000, पॅकेजिंग मशिन 1500 रुपये आणि लागणारे मनुष्यबळ दोन किंवा पाच व्यक्ती इतक्या बजेटमध्ये तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता.
3- तयार माल कुठे विकाल? या उद्योगातून तयार होणारा माल तुम्ही मसाले तयार करणाऱ्या कंपन्यांना विकू शकतात तसेच तुमच्या शहरांमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये देखील हा माल पुरवू शकतात.
कारण या उत्पादनाची आता मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेफर्स तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील कांदा पावडर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अशा कंपन्यांसोबत तुम्ही टाय अप करू शकतात व तुमचा व्यवसाय वाढवू शकतात.
Share your comments