1. कृषीपीडिया

Wheat Crop: पाणी कमी उत्पादन जास्त! गव्हाच्या या जबरदस्त वाणाला 35 दिवस सिंचनाची गरज नाही; शोषून घेते 268 पट जास्त पाणी

Wheat Crop: देशात सध्या खरीप पिकांची काढणी झाली आहे. तसेच रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतीची मशागत सुरु आहे तर काही ठिकाणी पेरणी देखील सुरु झाली आहे. या रब्बी हंगामामध्ये गहू पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र बाजारात गव्हाची अनेक वाण उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी अशी काही वाण आहेत त्यांना पाणी कमी लागते आणि उत्पादन जास्त मिळते.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
gahu

gahu

Wheat Crop: देशात सध्या खरीप पिकांची (Kharip Crop) काढणी झाली आहे. तसेच रब्बी पिकांच्या (Rabi Crop) पेरणीसाठी शेतीची मशागत सुरु आहे तर काही ठिकाणी पेरणी देखील सुरु झाली आहे. या रब्बी हंगामामध्ये गहू पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र बाजारात गव्हाची (Wheat) अनेक वाण उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी अशी काही वाण आहेत त्यांना पाणी कमी लागते आणि उत्पादन जास्त मिळते.

खरीप पीक काढणीनंतर रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकरी (Farmers) गव्हासह इतर पिकांचे बियाणे बाजारातून खरेदी करत आहेत. असे बियाणे बाजारपेठेत उपलब्ध व्हावे, त्यामुळे सिंचनासाठी पाणी कमी आणि उत्पादन बंपर मिळावे, असा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

पुसा संशोधन संस्थाही (Pusa Research Institute) अशा पिकांवर संशोधन करत आहे. पण सध्या आयआयटी कानपूरमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. पेरणीनंतर 35 दिवस पाणी लागणार नाही, असा गव्हाचा नवीन प्रकार येथे तयार करण्यात आला आहे.

दिवाळीमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या १४ तर २४ कॅरेटचा सोन्याचा नवीनतम दर...

गव्हाचे नॅनो कोटेड पार्टिकल सीड तयार

आयआयटी कानपूर इनक्यूबेटेड कंपनी एलसीबी फर्टिलायझरने गव्हाचे नॅनो कोटेड पार्टिकल सीड (Nano coated particle seed) तयार केले आहे. या बियाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पेरणी केली की 35 दिवस पाणी लागत नाही. उष्मा अधिक पडत असेल तर हे पीक करपण्याचा धोका अजिबात नाही. आतापर्यंत केलेल्या संशोधनात यश आल्याचे एलसीबीच्या संशोधकांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनो रब्बी हंगामासाठी व्हा तयार! गव्हाची पेरणी या महिन्यात होऊ शकते सुरू

268 पट पाणी शोषून घेते

संशोधकांनी सांगितले की, गव्हाच्या जंतूमध्ये नॅनो-पार्टिकल आणि अति-शोषक पॉलिमरचे कोटिंग केले गेले आहे. या कोटिंगचा फायदा असा आहे की गव्हावर लावलेले पॉलिमर 268 पट जास्त पाणी शोषून घेते. हे पाणी 35 दिवस गव्हामध्ये राहील. या काळात शेतकऱ्याला गव्हाला पाणी देण्याची गरज भासणार नाही.

महत्वाच्या बातम्या:
नॅनो युरिया पिकांसाठी ठरतोय वरदान; मिळत आहे हे 4 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या वापरण्याचे योग्य मार्ग
हरभरा पेरणीपूर्वी करा या पद्धतीचा अवलंब; उत्पादन होईल दुप्पट

English Summary: Wheat Crop: This formidable variety of wheat does not require irrigation for 35 days; Absorbs 268 times more water Published on: 25 October 2022, 12:47 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters