Business Idea: मित्रांनो तुम्हाला नोकरी करून कंटाळा आला असेल तर मोदी सरकारने (Modi Goverment) तुमच्यासाठी खास व्यवसाय (Business) आणला आहे. ज्यामधून तुम्ही दरमहा लाखों कमवू शकतो. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे तेही दुसऱ्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात आहेत. तर तुम्हीही मोदी सरकारने आणलेला हा व्यवसाय करू शकता.
केंद्र सरकार तुम्हाला मोठी कमाई करण्याची संधी देत आहे. कोविडच्या काळात वैद्यकीय क्षेत्राची मागणी वाढली आहे. केंद्र सरकार जेनेरिक औषधे (Generic drugs) पुरविण्यासाठी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र (Pradhan Mantri Janaushadhi Centre) उघडण्याची संधी देत आहे. यासाठी सरकारही मदत करत आहे.
PMJAY अंतर्गत, औषध केंद्रे उघडण्यासाठी SC, ST आणि अपंग अर्जदारांना पन्नास रुपयांपर्यंत औषध जास्त दिले जाते. प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी केंद्राच्या नावाने औषधाचे दुकान उघडले आहे.
जन औषधी केंद्र कोण उघडू शकतो
जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी, भारत सरकारने त्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे.
1. बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी जन औषधी केंद्र उघडू शकतात.
2. ट्रस्ट, एनजीओ, खाजगी रुग्णालय इ.
3. राज्य सरकारांनी नामनिर्देशित केलेल्या एजन्सी
जर तुम्हाला जनऔषधी केंद्र उघडायचे असेल तर तुमच्याकडे डी फार्मा किंवा बी फार्मा पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करताना पुरावा म्हणून पदवी सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा
जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सर्वप्रथम जनऔषधी केंद्राच्या नावाने 'किरकोळ औषध विक्री'चा परवाना घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरकडे अर्ज पाठवावा लागेल.
पावसाचे सत्र सुरूच! पुढील ४ दिवस धो धो कोसळणार; आयएमडीने दिला रेड अलर्ट
तुम्ही किती कमवाल
जन औषधी केंद्रामध्ये औषधांच्या विक्रीवर 20 टक्क्यांपर्यंत कमिशन दिले जाते आणि दरमहा केलेल्या विक्रीवर 15 टक्क्यांपर्यंत स्वतंत्र प्रोत्साहन दिले जाते. या योजनेअंतर्गत दुकान उघडण्यासाठी सरकारकडून दीड लाख रुपयांपर्यंतची तरतूद केली जाते. केंद्र सरकार बिलिंगसाठी संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत देखील देते.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! आठ लाख हेक्टरमधील उभी पिके उद्ध्वस्त
शेतकऱ्यांनो सावधान! पाऊस पडल्यानंतर तूर पिकात करा हे काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
Share your comments