1. कृषी व्यवसाय

Agri Bussiness: वर्मी कंपोस्ट करा तयार अन विकून कमवा बक्कळ नफा,वाचा माहिती

शेती, पशुपालन याशिवाय अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवायचे याचीच देशातील शेतकरी अनेकदा वाट पाहत बसलेला असतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही जनावरांच्या शेणातूनही लाखोंची कमाई करू शकता.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
making vermi compost bussiness is so profitable for farmer

making vermi compost bussiness is so profitable for farmer

शेती, पशुपालन याशिवाय अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवायचे याचीच देशातील शेतकरी अनेकदा वाट पाहत बसलेला असतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कीतुम्ही जनावरांच्या शेणातूनही लाखोंची कमाई करू शकता.

चांगल्या पिकासाठी शेतात अनेकदा रासायनिक खतांचा वापर केला जातो. आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे पिकातील कीटक नष्ट होतात तसेच पीकही खूप सुपीक होते, परंतु अशा खतांचे दुष्परिणामही होतात.

या रासायनिक खतांपासून तयार होणारी फळे, भाजीपाला आणि धान्यामध्ये पौष्टिक अन्नाचे प्रमाण खूपच कमी असते आणि शेतातील सुपीक क्षमताही कमी होते, त्यामुळे आता सर्वत्र सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे भाजीपाला आणि धान्याची मागणी वाढत आहे.

त्याची लागवड केली जाते. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करून पिकविले आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर तुम्ही गांडूळखताचा व्यवसाय करू शकता. याद्वारे तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

नक्की वाचा:Goat Care: शेळीपालनात आहात तर पावसाळ्याआधी शेळ्यांना दया 'या' लसी,आजार राहतील दूर

1) गांडूळखत युनिट कसे सुरु करावे :

 वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ कंपोस्टचे युनिट सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लांब पॉलिथिनची गरज आहे.

कंपोस्टिंगच्या जागेवर पॉलिथिन पसरवून चारही बाजूंनी झाकून ठेवावे जेणेकरून तेथे कोणतेही प्राणी येऊ शकणार नाहीत. यानंतर पॉलिथिनमध्ये शेणाचा थर तयार करून शेणा च्या आत गांडूळ टाकावीत.

त्यानंतर तुमचे कंपोस्ट काही महिन्यात तयार होईल. तुमचा व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करत रहा. ज्यासाठी तुम्हाला यापुढे गांडूळे आणि पॉलिथिन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.

नक्की वाचा:या' ठिकाणची एक गोवरी चक्क विदेशात विकली जात आहे 10 रुपयाला, तुम्हीही सुरु करू शकतात 'हा' हटके व्यवसाय

2) गांडूळ खतापासून कमाई कशी करावी:

 गांडूळ कंपोस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही ते ऑनलाइन माध्यमातूनही विकू शकता.ज्यासाठी अनेक विक्री आणि खरेदी साईट्स आहेत. याशिवाय तुम्ही शेतकऱ्यांना थेट वर्मी कंपोस्ट, किचन गार्डनिंग आणि फळ भाज्यांची रोपवाटिका यांना विकू शकता.

जर तुम्ही गांडूळखताच्या 20 युनिटचा  व्यवसाय सुरू केला तर तुम्ही एका वर्षात 8 ते 10 लाख रुपये सहज कमवू शकता.

नक्की वाचा:फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते

English Summary: making vermi compost bussiness is so profitable for farmer Published on: 02 July 2022, 03:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters