1. पशुधन

Goat Care: शेळीपालनात आहात तर पावसाळ्याआधी शेळ्यांना दया 'या' लसी,आजार राहतील दूर

बरेच शेतकरी जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करतात. बहुतांशी बऱ्याच शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक ते दोन शेळ्या तरी असतात. परंतु आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय केला जात असून फार मोठ्या संख्येत शेळी पालन केले जात आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this vaccination is so important before rainy session for goat

this vaccination is so important before rainy session for goat

बरेच शेतकरी जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करतात. बहुतांशी बऱ्याच शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक ते दोन शेळ्या तरी असतात. परंतु आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय केला जात असून फार मोठ्या संख्येत शेळी पालन केले जात आहे.

तसे पाहायला गेले तर सुशिक्षित बेरोजगार तरुण जास्त प्रमाणात या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. कारण हा व्यवसाय अगदी कमीत कमी खर्चात आणि कमी जागेत करता येतो व त्या तुलनेत नफा हा चांगला मिळतो.

परंतु शेळी पालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन आणि नियोजन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.

शेळ्यांचे व्यवस्थापन करताना शेळ्यांना आजारापासून दूर कसे ठेवता येईल याबाबत काळजी घेणे खूप गरजेचे असते. येथे जर चूक झाली तर मोठा आर्थिक फटका शेळीपालकाला बसू शकतो. इतर प्राण्यांप्रमाणे शेळ्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात.

नक्की वाचा:अशी गायीची जात जी दररोज 50 ते 80 लिटर दूध देते, जाणून घ्या..

 आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्याआधी शेळ्यांना लसीकरण करून घेणे खूप गरजेचे असते जेणेकरून भविष्यात होणारे नुकसान टाळता येणे शक्‍य होते. या लेखात आपण पावसाळ्याआधी शेळ्यांना कोणते लसीकरण करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

पावसाळ्याआधी शेळ्यांना करावयाचे लसीकरण

1- शेळी तीन महिन्याची असताना- शेळी जेव्हा तीन महिन्याची असते तेव्हा तिला आंत्रविषार या रोगा विरुद्ध चा पहिला लसीचा  डोस द्यावा. तसेच पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोसा 15 ते 20 दिवसांनी द्यावा.

नक्की वाचा:शेळीपालनातून दमदार कमाई हवी असेल शेळ्यांच्या या आजाराकडे द्या लक्ष

2- शेळी चे तीन महिने वय असताना- शेळीचे वय तीन महिन्याच्या असताना घटसर्प रोगा विरुद्ध ही लसीकरण करावे लागते. घटसर्प ची लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस तीन ते चार आठवड्यांनंतर करावा.

वर उल्लेख केलेल्या दोन्ही रोगा विरुद्धचे लसीकरण वर्षातून दोन वेळा आणि बरोबर सहा महिन्याच्या अंतराने केले गेले पाहिजे. याचा फायदा असा होतो की, शेळ्यांची वाढ देखील निरोगी होते व त्यांना कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही व चांगले वजन वाढते.

 लसीकरणानंतर घ्यायची काळजी

 शेळ्यांना लसीकरण करताना कोणत्याही दोन लसीकरणाच्या दरम्यान कमीतकमी 21 दिवसांचे अंतर ठेवणे गरजेचे असते. कारण तुम्ही जर लस दिली तर लस दिल्यानंतर त्या लशीचा संभावित प्रभाव दिसण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी जायला लागतो.

तसेच लसीकरणानंतर काही वेळेला शेळ्यांना हलकासा ताप येण्याची शक्यता असते. तसेच लसीकरण करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते तज्ञ पशुवैद्यकाच्या मार्फतच करणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:नंदीदुर्गा, बिद्री आणि भाखरवाली या शेळ्यांच्या जाती आहेत शेळी पालनासाठी उत्तम, वाचा या शेळ्यांची सविस्तर माहिती

English Summary: this vaccination is so important before rainy session for goat Published on: 02 July 2022, 02:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters