औषधी गुणधर्म असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. लिंबापासून अनेक उपयुक्त असे पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे महिला बेरोजगार आणि बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
1) रस काढण्यासाठी मोठ्या आकाराची चांगली पिवळसर फळे घेऊन स्वच्छ धुऊन घ्यावी. लिंबू रेसर च्या साहाय्याने रस स्टीलच्या पातेल्यात काढून गाळून घ्यावा.
2) स्टीलच्या पातेल्यामध्ये रस 80 अंश सेल्सियस तापमानाला 20 मिनिटे गरम करावा. किंवा प्रति लिटर रसामध्ये 600 मिलि ग्रॅम सोडियम बेन्झोएट मिसळावे.
3) बाटल्या व झाकणे उकळत्या पाण्यात 25 ते 30 मिनिटे ठेवून निर्जंतूक करून त्या कोरड्या कराव्यात व त्यामध्ये ताबडतोब रस भरून घ्यावा. निर्जंतुक करून घेतलेली झाकणे बसवून हवाबंद करावीत.
4) या रसाचे स्क्वॅश, सरबत, सिरप करता येते. रासायनिक संरक्षक वापरून साठवलेल्या रसापासून स्क्वॅश सरबत करताना पुन्हा सोडियम बेंजोएट मिसळण्याचे आवश्यकता नसते.
1) स्क्वॅश :
1) स्क्वॅश तयार करण्यासाठी 20 टक्के रस 45 टक्के साखर आणि 1 टक्का सायट्रिक आम्ल घ्यावे.
2) सरबताप्रमाणेच स्क्वॅश तयार करावा. परंतु रस 1 लिटर साखर 2 किलो आणि पाणी 1 लिटर घ्यावे.
3) 1 लिटर स्क्वेअर पासून 8 लिटर सरबत तयार करता येते.
2) लोणचे :
1) लिंबाचे लोणचे गोड आंबट तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते.
2) लोणचे तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली पिवळ्या रंगाची व मोठ्या आकाराची फळे निवडावीत. व स्वच्छ धुवून फडक्याने कोरडी करावीत.
3) लोणचे तयार करताना जितकी जास्त स्वच्छता राखली जाईल तेवढे चांगल्या प्रतीचे लोणचे तयार होते. व ते खराब होत नाही.
4) लिंबू स्वच्छ धुऊन व कोरडे करून घेतलेल्या लिंबाच्या स्टीलच्या तीक्ष्ण सुरीने चार सारख्या फोडी कराव्यात. व त्यातील बिया काढाव्यात. लिंबाचे गोड लोणचे तयार करण्यासाठी खालील घटक पदार्थ वापरावीत.
1) लिंबू :- 1 किलो
2) मीठ :- 120 ग्रॅम
3) आले (बारीक तुकडे केलेले) 50 ग्रॅम
4) हळद, बिलायची, मिरे, बडीशेप, लाल तिखट प्रत्येकी 15
ग्रॅम
5) लवंग 5 नग
6) गुळ 700 ते 800 ग्रॅम
1) काचेची बरणी स्वच्छ करून नंतर ती गरम पाण्याने धुऊन कोरडी करून कडक उन्हामध्ये मध्ये 3 ते 4 तास उलटी करून ठेवावी.
2) स्टीलची मोठी थाळी घेऊन त्यामध्ये प्रथम लिंबाच्या फोडी घेऊन त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात.
3) गुळाचा शेगडीवर मंद आचेवर पाक करून घ्यावा व स्टीलच्या चाळणीने गाळून घ्यावा थोडा थंड झाल्यास तो लिंबाच्या फोडी वर टाकावा.
4) दुसरीकडे बडीशेप, लवंग, मिरे भाजून बारीक कुटून घ्यावे.
( लिंबाचा बारीक किस + गुळ + मीठ + मसाला) एकत्रित करून शिजवावे व तो घट्ट होईपर्यंत शिजवावे नंतर ते थंड करावे आणि उन्हामध्ये ठेवलेल्या रुंद तोंडाच्या भरणी मध्ये हे लोणचे भरावे झाकण घट्ट लावून ते स्वच्छ व कोरड्या ठिकाणी ठेवावे.
3) सरबत :
1) घटक: रस 500 मिली, साखर 1.30 किलो, पाणी 8 लिटर
2) सरबतामध्ये 5% रस 15 टक्के साखर आणि 0.25 टक्के सायट्रिक आम्लाचे प्रमाण असावे.
3) लिंबाचा गाळून घेतलेला रस घ्यावा. स्टीलच्या पातेल्यात 8 लिटर पाणी घेऊन त्यात साखर मिसळून मंद आचेवर मिश्रण विरघळवून गाळून घ्यावे.
4) थोडे थंड झाल्यावर लिंबाचा रस त्या साखरेच्या मिश्रणात मिसळून घ्यावा निर्जंतुक कोरड्या बाटल्यांमध्ये सरबत भरावे आणि घट्ट झाकणे बसवून घ्यावीत.
5) बाटल्या 80 अंश सेल्सिअस तापमानाला गरम पाण्यात उकळून बाहेर काढून त्या थंड होण्यासाठी उघड्यावर ठेवाव्यात.
4) लिंबाचे औषधी गुणधर्म :
1) सकाळी उठल्यावर लिंबू-पाणी व मध द्यावे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे पचनसंस्था सुरळीत चालते.
2) लिंबामध्ये पेक्टिन तंतुमय घटक आहे. या तंतुमय पदार्थांच्या नियमित सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
3) हृदयविकार होण्याची ही संभावना कमी होते.
4) पाण्यात लिंबाचा रस व जिऱ्याची पूड घालून पिल्यास यकृताचे रोग बरे होतात.
5) 100 ग्रॅम लिंबात 57 कॅलरी ऊर्जा असते. त्याशिवाय जीवनसत्व- क 40 मिलिग्रॅम असते. बी गटातील जीवनसत्व थायमिन रायोप्लेविन नायासिनही मुबलक प्रमाणात असतात.
6) लिंबातील जीवनसत्व क मुळे फेरिक स्वरूपातील लोह तत्वाची उपलब्धता व ॲनिमिया कमी करण्यास मदत होते.o
7) लिंबू फळा पासून सायट्रिक आम्ल तयार होते. या सायट्रिक आम्लाची उपयोग प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी होतो.
( स्रोत-ॲग्रोवन)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:आता रंगेबिरंगी भाताची जगभरात चर्चा; अनेक आजारांवर आहे उपयुक्त
नक्की वाचा:तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
Share your comments