सध्या अनेकांची पावले ही खेड्याकडे वळू लागली आहेत. याचे कारण म्हणजे हुरडा पार्ट्यांचा बेत गावाकडे आखला जात आहे. यामुळे थंडीच्या या महिन्यात मंगळवेढ्यातील स्पेशल हुरडा पार्ट्यांची चर्चा नेहमीच सर्वत्र असते. त्यातच हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष असल्याने यंदा हुरड्याचा बाज अजूनच वाढला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात कोवळ्या ज्वारीची कणसे भाजून त्याचा गरम गरम आस्वाद घेताना सोबत भाजलेले शेंगदाणे, गूळ, काळी चटणी, रानमेवा आणि कुटुंबीय व मित्रजनांची साथ सांगत. यामुळे याची चव अजूनच वाढत आहे. अनेकजण सुट्टी घेऊन याची चव चाखत आहेत.
मंगळवेढ्याच्या सुप्रसिद्ध हुरड्याची चव सगळीकडे प्रसिद्ध आहे. ज्वारीचे पीक राज्यभरातील अनेक भागात घेतले जाते. मात्र मंगळवेढ्याच्या या ज्वारीची चवच इतकी न्यारी आहे की ज्यामुळे भारत सरकारने या मंगळवेढ्याच्या ज्वारीला GI मानांकन दिले. यामुळे याचे महत्व अजूनच वाढले आहे.
बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनास सुरुवात, कृषिमंत्र्यांसह अजित पवार राहणार उपस्थित
ज्वारीच्या ताटामधून वाट काढत एखाद्या डेरेदार झाडाखाली हुरडा पार्टीसाठी मंडळी जमा होतात. महिला वर्ग घरी बनवलेले काळे तिखट, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या, मिरचीचे ठेचे आणि गुळाचे खडे पिशव्यांतून भरून रानात येतात. अनेकांची यामध्येच व्यवसाय सुरु केला आहे. यातून त्यांना चार पैसे देखील मिळू लागले आहेत.
नोकरीला रामराम करत स्ट्रॉबेरीची लागवड! प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा
एकदा का तोंडाला हुरड्याची चव लागल्याने सोबत गूळ आणि चटणीचा आस्वाद घेत प्रत्येक जण आपल्या ताटातील हुरडा फस्त करण्यात गुंतलेला असतो. यामुळे शहरातील अनेकांचा खेड्याकडे येण्याचा कल या काळात वाढला आहे. शनिवार रविवार अनेकजन मोठी गर्दी करतात.
महत्वाच्या बातम्या;
इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नाही, प्रदर्शन पाहून भारावलो, कृषिमंत्र्यांकडून राजेंद्र पवार यांचे कौतुक
शेतकऱ्यांनो शेती सोबत एक पोल्ट्री टाकाच, रोज एक कोटी अंड्यांचा आहे तुटवडा..
शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळाच पाहिजे, शेतकरी संघटना आक्रमक..
Share your comments