1. बातम्या

इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नाही, प्रदर्शन पाहून भारावलो, कृषिमंत्र्यांकडून राजेंद्र पवार यांचे कौतुक

बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांचे कौतुक केले आहे. त्यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Agricultural exhibition

Agricultural exhibition

बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांचे कौतुक केले आहे. त्यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले, बारामतीत भरलेलं कृषी प्रदर्शन (Baramati Agricultural Exhibition) पाहून मी भारावून गेलो, हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी येऊन पाहायला हवं, राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी अत्यंत उत्तम नियोजन केलं आहे. इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नसल्याचे सत्तार म्हणाले.

शेतीत नवीन काय प्रयोग करतो किंवा करायला पाहिजे या संदर्भातील माहिती इथे मिळते. राजेंद्र पवार यांनी बारामतीत शेतीत वेगवेगळे प्रकल्प राबवले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तसेच राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं योगदान कोणीही विसरणार नसल्याचे सत्तार म्हणाले.

शिंदे सरकारने शब्द पाळला! नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

मी सिल्लोडमध्ये भरवलेल्या कृषी प्रदर्शनापेक्षा किती तरी मोठं कृषी प्रदर्शन बारामतीत भरवले आहे. मी पण येथून काहीतरी शिकून जाईल असेही सत्तार म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन 19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे. 3 ते 18 जानेवारी यादरम्यान स्टार्टअप किंवा इतर इन्होव्हेटर यांच्याकरता वेबीनारचे आयोजन केरण्यात आले होते.

बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनास सुरुवात, कृषिमंत्र्यांसह अजित पवार राहणार उपस्थित

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक 2023 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित आहेत.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो 31 मार्च पर्यंत वीजबिल भरा आणि 30 टक्के सूट मिळवा, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
शेतकऱ्यांनो कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज
नोकरीला रामराम करत स्ट्रॉबेरीची लागवड! प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा

English Summary: Agricultural exhibition high technology anywhere, exhibition, Rajendra Pawar Agriculture Minister Published on: 19 January 2023, 04:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters