शेतीमध्ये बरेच शेतकरी शेती करीत असताना पशुपालन, कुकुटपालन व शेळी पालन मोठ्या प्रमाणात करतात. व्यवसायासाठी वेगळ्या पद्धतीचे भांडवल म्हणजेच पशुपालनाला जास्त भांडवल लागते तर शेळीपालनाला त्यामानाने कमी लागते, या पद्धतीचा फरक असतो. परंतु या जोडधंद्यासोबतच बरेच शेतकरी आता मधुमक्षिका पालन म्हणजेच मधमाशी पालन मोठ्या प्रमाणात करू लागले असून या व्यवसायाला शासनाकडून देखील आर्थिक मदत प्राप्त होते.
या लेखात आपण या व्यवसायाची एकूण आर्थिक प्राप्ती देण्याची क्षमता व या व्यवसायाला मिळणारी शासनाची मदत इत्यादी जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा:Scheme:महावितरणची 'ही' योजना आहे खूप फायदेशीर,वीज बिलामध्ये करता येते मोठी बचत
मधुमक्षिका पालन एक फायदेशीर व्यवसाय
जर आपण या व्यवसायाचा अंदाज अर्थात या व्यवसायात असलेले संधीचा विचार केला तर शेतीशी संबंधित इतर जोडधंदाच्या मानाने हा व्यवसाय अगदी कमीत कमी प्रमाणात अजूनही शेतकरी करतात. त्यामुळे हीच संधी हेरून कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांनी केला तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगला नफा होऊ शकतो.
या व्यवसायाचे एकंदरित स्वरूप आणि लागणारे भांडवल
समजा तुम्ही मधमाशीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अगोदर दहा पेट्यापासून सुरुवात केली तर त्यासाठी तुम्हाला 35 ते 40 हजार रुपये पर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.
या माध्यमातून मधमाशांचा विचार केला तर त्यांची संख्या प्रतिवर्षी वाढत जाते व जितके जास्त प्रमाणात मधमाशांचा संख्येत वाढ होते तितकेच जास्त मधाचे उत्पादन होते व शेतकऱ्यांना मिळणारा नफा देखील वाढत जातो.
जर शेतकऱ्यांनी मधमाशा पालनासाठी म्हणजेच त्या ठेवण्यासाठी सेंद्रिय मेणाची अर्थात ऑरगॅनिक वॅक्स ची व्यवस्था केली तर एका पेटीमध्ये जवळजवळ पन्नास हजार पेक्षा जास्त मधमाशा एकत्र ठेवता येणे शक्य आहे व या मधमाशांच्या पालनातून सुमारे एक क्विंटल मध तयार होते.
इतके मिळते शासनाचे अनुदान
मधमाशी पालनाचे संबंधित नॅशनल बी बोर्ड यांनी मधमाशी पालनासाठी शेतकऱ्यांना लागेल ती मदत करता यावी यासाठी नाबार्डसोबत देखील एक करार केला आहे.
नॅशनल बी बोर्ड आणि नाबार्ड हे दोघेही मिळून भारतात मधमाशी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करता यावा यासाठी योजना सुरु केली असून केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून मधमाशीपालनाला 80 ते 85 टक्क्यांपर्यंत अनुदान देते.
या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न
जर तुम्ही प्रति पेटी 1000 किलो मध तयार केले तर तुम्हाला दरमहा पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. म्हणजे आता जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर मधाची किंमत प्रति किलोस 400 ते 700 रुपये आहे.
Share your comments