कालपासून राज्याच्या विविध भागात पावसाने (rain) हजेरी लावली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला दिसून आला.
पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने राज्यात पावासाचा इशारा दिला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील हवामान विभागानं केलं आहे. हवामान विभागानं (Meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जनावरांच्या आहारात करा 'या' खाद्याचा वापर; दुग्ध उत्पादनात होईल वाढ
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो.
मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
महत्वाच्या बातम्या
17 सप्टेंबरपासून सूर्याप्रमाणे चमकणार भाग्य; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
भरपूर मांसासाठी कोंबड्यांना आहार कोणता द्यावा?
गाभण शेळयांची काळजी कशा प्रकारे घ्यावी? वाचा सविस्तर
Share your comments