सध्या महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती पाहिली तर 'कुठे खुशी कुठे गम' अशी परिस्थिती आहे. काही भागामध्ये चांगला पाऊस बरसला असून पेरण्यांना वेग आला आहे.
तर महाराष्ट्राचा बर्याचशा भागांमध्ये पेरणीयोग्य सुद्धा पाऊस न झाल्यामुळे सगळे पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी राजा चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.
परंतु आता पावसाने चांगली सुरुवात केली असून सोमवारपासून मुंबई परिसरात विशेष करून ठाणे आणि मुंबईत सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
नक्की वाचा:IMD Alert: राज्यातील 'या' भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाची शक्यता
मुंबई सह उपनगरात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात देखील पावसाने चांगली हजेरी लावली असून मुसळधार पाऊस सुरू आहे.
दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागात सकाळपासून पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी पेक्षा जास्त पाऊस होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कोकणामध्ये येणाऱ्या तासात मध्यम ते तीव्र सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
नक्की वाचा:गल्ली ते दिल्ली पावसाचा अंदाज"; 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगेची पातळी वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत
काही नद्यांना पाणी
उल्हास, गाढी, पाताळगंगा,अंबा, सावित्री या नद्यांची पातळी तसेच कुंडलिका नदीने देखील इशारा पातळी ओलांडली आहे. या नद्याशिवाय जगबुडी आणि काजळी नदीचे पाणी देखील इशारा पातळीच्या वरून वाहत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अलर्ट करण्यात आली असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खबरदारी चे निर्देश दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर संपूर्ण जलमय झाले असून या शहरातील मुंबई-गोवा महामार्गाला नदीचे रूप आले आहे. मुंबईत सुद्धा ठिकाणी पाणी साचले असून प्रवाशांचे पुरते हाल झाले आहेत.
Share your comments