Weather Update : देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. राज्याच्या बहुतांश भागातून देखील मान्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडका जाणवू लागला आहे. यामुळे लवकरच मॉन्सून राज्यासह संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता आहे.
राज्यातून मान्सून बऱ्यापैकी माघारल घेतली असल्यामुळे हवामान कोरडे झाले आहे. यामुळे तापमानाचा चटका वाढला आहे. तसंच राज्याच्या बहुतांश तापमानाने ३५ अंशाचा पारा पार केला आहे. तसंच आगामी काळात तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून मान्सूनची माघार झाली आहे. यासोबतच बिहार, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातून देखील मान्सून माघार घेत आहे.
कमी पावसाचा शेतमाल उत्पन्नावर परिणाम
यंदा राज्यातील खरीप हंगाम चांगला येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी होती. तसच हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात चांगला पाऊस झाला नाही. राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित मोसमी पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पन्नावर होणार आहे. खरीप हंगमात उत्पादन मोठया प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बहुतांश भागातून मान्सूनची माघार
देशातून मान्सून परतीचा प्रवास सुरु असल्यामुळे काही भागात पावसाची हजेरी सुरु आहे. गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. मान्सूनची माघार झाल्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. तर हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर भागात पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
Share your comments