Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मिचॉन्ग चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळाचा आंध्रप्रदेश, तामिळनाडू, चेन्नई, ओडिशा, तेलंगणा आणि पुद्दचेरी यांना फटका बसणार आहे. त्यामुळे येथिल नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे वादळ आज (दि.५) आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
वादळामुळे वातावरणात बदल झाल्याने चेन्नईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने एवढी हजेरी लावली आहे की, वाहने बोटीसारखी रस्त्यावर तरंगताना दिसत आहेत. वादळामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. चेन्नई, चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
वादळ येण्याआधीच पूर्व किनारपट्टीवरील ५ राज्यांना अलर्ट मोड देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. वादळ किनाऱ्यावर धडकताना त्याचा वेग ९० ते ११० प्रतितास वेगाचा असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या वादळाचा महाराष्ट्रावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्याान, मिचॉन्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा फरक पडणार नाही. पण राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ हे हिंदी महासागरातलं यंदाच्या वर्षातले सहावे वादळ आहे.
Share your comments