Weather Update News : राज्यात थंडीचा पारा आता वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंस सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली. याबाबत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा तसेच विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली. निफाडमध्ये राज्यातील नीचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर गोंदियात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवण्यात आलं.
मराठवाड्यातील तापमानाचा पाराही घटलाय. वाढत्या थंडीचा जनजीवनावर परिणाम होताना दिसतोय. उर्वरित महाराष्ट्रातही 2 दिवसांत तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
"शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध"
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.
Share your comments