1. हवामान

Weather Update : पुढचे 12 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, या भागाला ऑरेंज अलर्ट

राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्याप समाधनकारक पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत. यादरम्यान हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात बहुतांश भागात येत्या ५ दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Update

या पावसाच्या शक्यतेदरम्यान राज्यात मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज आहे. आज पुणे रत्नागिरी आणि रायगडसह विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस बरसेल. पुण्यात पुढील 4 दिवस सलग ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. मुंबईमध्येही पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

English Summary: Weather Update: Heavy rain in the state for the next 12 days, orange alert for this area Published on: 18 July 2023, 10:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters