
Weather Update
पुणे : राज्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्यभरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट हवामान विभागान जारी केला आहे. हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीट होण्यात अंदाज हवामान व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
अवकाळी पावसासोबतच वादळी वारे देखील येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आता चिंतातूर झालेत. वादळी वादळ्यामुळे उभी पिके आडवी होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात गारपीट होणार असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा वाढताना दिसत होता. मात्र, आता ढगाळ वातावरण झाल्याच चित्र दिसून येत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Share your comments