Monsoon update 2024 : मान्सूनची वाट बघणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंदमान-निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मान्सूनला पोषक वातावरण मिळाले आहे. सध्या मान्सून श्रीलंकेत दाखल झाला असून श्रीलंकेतून पुढे सरकण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे.
तसंच नैऋत्य मान्सूनची मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रातून आणि दक्षिण बंगालच्या उपसागरातून मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत मान्सूनची चांगली वाटचाल होणार आहे. यामुळे लवकरच मान्सून केरळात दाखल होणार आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि मध्य उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दक्षिण कोकणच्या काही भागात आणि दक्षिण गोव्यात देखील तुरळक ठिकाणी पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण कोकणात आणि गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. यासोबत मराठवाड्याच्या काही भागात देखील ढगाळ वातावरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज (दि.२४) रोजी देशातील तापमानात फारसा बदल झालेला नाही. गुजरातमधील अहमदाबाद येथे ४६.६ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर जळगाव येथे ४५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर सातारा येथे २१.६ अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान होते.
Share your comments