Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात राज्यात पावसाची आणि थंडीच दुहेरी संकट पाहायला मिळत आहे. तसंच आज (दि.३०) रोजी वातावरण थंड राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर भारतातील हवामान बदलण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या थंडीत अनेक राज्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीशिवाय पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पुढील 3 दिवसांत हलका पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीचे दिवस कायम आहेत. त्याचवेळी दिल्लीतील खराब हवामानामुळे वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे. मात्र, लवकरच संपूर्ण उत्तर भारताला थंडीपासून दिलासा मिळू शकतो, असंही हवामान खात्याने म्हटले आहे.
देशाची हवामान प्रणाली
हवामान खात्यानुसार, 31 जानेवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यावर चक्रीवादळ आहे, ज्यामुळे हंगामी क्रियाकलापांमध्ये बदल दिसून येतील.
Share your comments