
Weather Update
Maharashtra Weather Update : राज्यातील ढगाळ वातावरण निवाळल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज (दि.१५) रोजी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. यामुळे आता विदर्भात उकाडा वाढल्याने नागरिकांना गरमीचा सामना करावा लागणार आहे. मात्र उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे.
तापमानात घट होण्याचा अंदाज
पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस घटण्याची शक्यता आहे.उत्तर भारतातून येणारे वारे थंड आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात विदर्भात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत तापमानात ३ अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतर वातावरणात देखील बदल जाणवणार नाही, असंही हवामान खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, विदर्भात आज जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात आज तापमानात आंशिक वाढ झाली आणि पारा ३१ अंशावर पोहोचला आहे. दुसरीकडे रात्रीच्या तापमानात काहीशी घट जाणवली असून १६ अंशांवर पारा नोंद करण्यात आली आहे.
Share your comments