Weather Update : गेल्या आठवड्याभरात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी पहाटे मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, येत्या चार दिवसात राज्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. २५ मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात अनेक भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यानंतर पावसाचं सावट नसलं तरी तापमान वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होता. पण मंगळवारी मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली.
पश्चिमेकडून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्याच्या अनेक भागात मंगळवारी सकाळी पाऊस पडला. येत्या काही दिवसात ही स्थिती अशीच राहू शकते. तर तापमान किमान तीन अंश सेल्सिअसने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्याच्या पाठीमागची साडेसाती काही संपेना! 24 मार्चनंतर पुन्हा अवकाळीचा इशारा...
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे.
या महिन्यात दोन वेळा आलेल्या अवकाळीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. त्यातच पुन्हा अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकऱ्याने जगायचं कसं ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
"अहो साहेब द्राक्षांऐवजी गांजाची शेती करू द्या..!" कृषीमंत्र्यांकडे शेतकऱ्याची अजब मागणी
Share your comments