Weather Update : हवामानात झालेल्या बदलामुळे उत्तर भारतात थंडीटी लाट पसरली आहे. हवामान खात्याने उत्तर भारतातील काही राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर भारतात थंडीसह धुक्याची चादर देखील पाहायला मिळत आहे. तसंच लखनऊसह उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यताही हवामान खात्याने दिली आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट
काल (दि.३) दिल्लीतही तापमानाचा पारा घसरला आहे. सोमवारी सकाळी दिल्लीत या मोसमातील सर्वात कमी तापमान ३.३ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे. शहरातील बहुतेक भागांमध्ये दाट धुकं पाहायला मिळालं. दिल्लीत आज थंडीची लाट येण्याचा शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तसंच आज सकाळपासून सर्वत्र दाट धुके पाहायला मिळत आहे. धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात देखील चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. काही भागात आता गारठा वाढला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढला आहे. आज मंगळवारी नाशिकमध्ये निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील तापमानात चढ-उतार
दरम्यान, राज्यात किमान तापमानात घट होऊ लागली आहे. यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. नाशिकनंतर धुळे येथे ७.४ अंश सेल्सिअस, तर जळगाव येथे ९.९ तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात थंडीचा जोर फारसा नाही. तसंच राज्यात किमान तापमानात घट होत असल्याने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Share your comments