राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून आज दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज देण्यात आला असून पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उर्वरित ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून हा पट्टा गुजरातच्या नालिया,अहमदाबाद,ब्रह्मपुरी तसेच जगदलपूर ते बंगालचा उपसागर पर्यंत सक्रिय आहे.
नक्की वाचा:IMD Alert: आज कोकणासह या भागात मुसळधार पाऊसाचा इशारा; अलर्ट जारी..
पूर्व मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा असून विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये विश्वास असलेले हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा देखिल हवामान अंदाज समोर येत असून त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात 22 सप्टेंबर पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
सदर कालावधीतील कोसळणारा पाऊस हा भाग बदलत पडणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. राज्यातील विदर्भ विभागातील अकोला जिल्ह्यात तसेच राजधानी मुंबई, उत्तर महाराष्ट्र, नासिक, मराठवाड्यातील लातूर,सोलापूर,उस्मानाबाद,औरंगाबाद, तसेच हिंगोली, अहमदनगर, पुणे,
सातारा या जिल्ह्यांमध्ये 16 सप्टेंबरपर्यंत जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या अंदाजानुसार या कालावधीत मुंबईमध्ये देखील अतिवृष्टी ठेवण्याची शक्यता असून राज्यात 20, 21 आणि 22 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे.
नक्की वाचा:Panjabrao Dakh : राज्यातील या भागात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबरावांचा इशारा
Share your comments