देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) मंगळवारीही अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
आज सकाळपासून मुंबईसह (Mumbai) कोकणात आणि विदर्भासह मराठवाड्यात चांगला पाऊस कोसळत आहे. राज्यात प्रामुख्याने कोकणसह पालघर, नंदुरबार, नाशिक, (nashik) ठाणे, धुळे, जळगाव पुढील तीन दिवसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने दिली 'ही' मोठी सवलत; जाणून घ्या
हवामान विभागाने सातारा आणि पुणे जिल्ह्यात उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी केला आहे. तर संपूर्ण विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे.
शेतकऱ्यांना होणार दुप्पट फायदा! जमीनच नाहीतर जमिनीच्या वरही करता येणार शेती; वापरा ही पद्धत..
कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे.
संततधार पावसामुळे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Share your comments