Unseasonal rain : अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मध्यरात्रीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत भर पडली आहे.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा मात्र धास्तावला आहे. कारण या पावसामुळं हातातोंडाशी आलेली पीकं वाया जाण्याच शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. विशेषत: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
या पावसाचा तूर पिकासह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठं फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. ढगाळ हवामानाचा जिल्ह्यातील तूर आणि पालेभाज्यांना पिकांना मोठा फटका बसला आहे.
पेन्शनधारकांना नवीन वर्षाची भेट, या लोकांना मिळणार अधिक पेन्शन
ढगाळ वातावरणामुळं तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीने पालेभाजी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. रात्री बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव तालुक्यात विजासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ! पगार किती वाढणार हे जाणून घ्या
Share your comments