गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना (farmers) नुकसानिस सामोरे जावे लागत आहे. आता मागच्या काही दोन तीन दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र पावसाने (rain) विश्रांतीनंतर विदर्भात धुमाकूळ घातला आहे. 17 जुलै पासून पावसाचा जोर वाढला आहे.
विदर्भात अतिवृष्टी होऊन अनेक जिल्ह्यांमध्ये 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काल 18 जुलैपासून व्हराडासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सतत पाऊस आहे. तसेच नागपूर विभागातील 33 तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
थोड्याश्या विश्रांतीनंतर विदर्भातील पावसाने पुन्हा जोर धरल्याने गडचिरोली जिल्ह्यात पुरपरिस्थिती कायम असल्या कारणाने तब्बल 25 मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच या अतिवृष्टीमुळे व पुराच्या भीतीमुळे 2345 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
EPF Investment: पीएफचे पैसे तुम्हाला करोडपती बनवतील; कसे ते पहा...
Weather Update : या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने जारी केला अलर्ट, जाणून घ्या हवामान
यासह अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर शिवारात सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिके पाण्याखाली आली असल्याने येथील शेतकऱ्यांना नुकसानिस सामोरे जावे लागत आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपुर, जळगाव जामोद, शेगाव या तालुक्यांमद्धे पावसाचा जोर अधिक होता. अकोला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमद्धे जोरदार पाऊस झाला आहे.
मागील 24 तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस
कोकण – माथेरान 50, संगमेश्वर 40, कणकवली, वाडा, लांजा, तळा, मुरुड, चिपळूण या ठिकाणी संतधारापाऊस सुरू आहे.
मध्य महाराष्ट्र – महाबळेश्वर 70, गगणबावडा 60, पन्हाळा, राधानगरी, गारगोटी, यावल, इगतपुरी, सोलापूर, लोणावळा, पारोळा, शाहूवाडी रावेर.
मराठवाडा – बिलोली निलंगा, मुदखेड, जळकोट, नांदेड, माहुर, देगलूर, किनवट, अर्धापुर, अहमदपूर, हिंगणघाट, भोकर, लोहा, उमरी, धर्माबाद, मुखेड, हिंगोली, नायगाव, खैरगाव, परभणी, गंगापुर, पालम, शिरूर.
विदर्भ – हिंगणघाट, गडचिरोली, राळेगाव, वर्धा, बाभूळगाव, नागपूर, अमरावती, कामठी, मोरगाव, हिंगणा, यवतमाळ, संग्रामपूर, शेवगाव, नांदगाव काझी.
Share your comments