गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. यामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आता सातारा (Satara) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील वाई कवठेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे घरांचे शेतीचे नुकसान झाले, यामुळे नद्या नाले भरून वाहत आहेत.
येथील कवठे गावच्या हद्दीतील महामार्गावरील सर्विस रोडवर पाणी साठले. तसेच जवळच असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी या भागात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. वाई कवठेमध्ये घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये देखील पाणी घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे पर्यटकांची धांदल उडाली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठे नुकसान झाले आहे.
याचा फटका राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा बसला आहे. सध्या या परिस्थितीचे पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे दौरे देखील सुरू झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
दोन कोटींहून जास्त रेशनकार्ड रद्द, मोदी सरकारच्या मोठा निर्णय..
ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का, 'या' जागांवर होणार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका
श्रीलंकेनंतर आता इराक, आंदोलकांचा संसदेवर ताबा, देशातील परिस्थिती हाताबाहेर..
Share your comments