Weather News : उत्तर भारतातील थंड वाऱ्यांच्या राज्यातील वातावरणावर परिणाम दिसून आला आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला असून थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात देखील सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. तसंच राज्याच्या बहुतांश भागातील तापमानात घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशांवर असल्याचं दिसून आलं आहे.
राज्यातील तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. तसंच दुसरीकडे हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आलेत. जर कोकणात अवकाळीने हजेरी लावली तर आंबा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर भारतातील बहुतांश भागात तीव्र थंडी कायम आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील. त्याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये पुढील ५ दिवस थंडी राहील. पंजाब, हरियाणा आणि बिहारच्या अनेक भागात दाट धुके दिसून येईल.
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे धुके आणि थंडीपासून काहीसा दिलासा मिळू शकेल, असा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. त्याचवेळी थंडीची लाट आणि धुक्यामुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी कायम राहणार आहे.
Share your comments