राज्यामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसापासून पावसाने खंड दिल्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. खरीप पिकांसाठी जोरदार पावसाची गरज असून शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
परंतु राज्यामध्ये पावसासाठी सध्या पोषक वातावरण नसल्यामुळे सध्या तरी राज्यात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
तसेच येणाऱ्या काही दिवसांचा अंदाज पाहिला तर भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांमध्ये देखील जोरदार पाऊस न होता हलक्या पावसाची शक्यता आहे. कारण पावसासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा अंदाज
राज्यामध्ये सध्या पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडेल तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. जर सध्या देशांतर्गत पातळीचा विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये जी काही प्रणाली तयार झाली आहे त्यामुळे देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस आहे.
परंतु राज्याचा विचार केला तर अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. या पावसाचा खरीप पिकांना कुठलाही फायदा नसून जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
कालावधीमध्ये कोकणात बहुतेक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परंतु हा पाऊस सरासरीच्या खूप कमी असेल. त्यानंतरच्या आठवड्यात देखील पावसाची ही स्थिती राहण्याची शक्यता आहे.
मात्र त्यामध्ये थोडी बहुत सुधारणा होऊ शकते. परंतु सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रामध्ये मान्सूनला अनुकूल प्रणाली तयार होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल.
Share your comments