यावर्षी पावसाने जो काही महाराष्ट्रमध्ये धुमाकूळ घातला तो अद्याप पर्यंत चालूच असून अजून देखील महाराष्ट्रमध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झाल्यामुळे जे काही शिल्लक पिके होती त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. जर आपण कालचा विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला.
नक्की वाचा:50 हजार प्रोत्साहनपर लाभ योजनेचा २० ऑक्टोबरपासून शुभारंभ, सहकारमंत्र्यांची माहिती..
जर आपण कालचा विचार केला तर काल नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. या दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्रा तसेच विदर्भ आणि मराठवाडा या चारही विभागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
जर आपण भारतीय हवामान विभागाचा अंदाज पहिला तर कोल्हापूर जिल्ह्यात तसेच इतर नऊ जिल्ह्यात पावसाची शक्यता असून यामध्ये कोकण विभागातील सिंधुदुर्ग,रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात तसेच राजधानी मुंबई व पुणे,सातारा इत्यादी ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे.
काय म्हणतो पंजाबरावांचा हवामान अंदाज?
शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केलेले पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला असून त्यांच्यामते 19 तारखेपासून महाराष्ट्र मध्ये पावसाची उघडीप होणार असून आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजेच उद्याचा दिवस हा पावसाचा राहणार आहे. तसेच 19 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार असल्याची माहितीदेखील पंजाबराव यांनी दिली आहे.
तसेच येणाऱ्या 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील सातारा,सांगली आणि कोल्हापूर या द्राक्षपट्ट्यात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून सोयाबीन आणि कापूस पिकाची काढणी सुरू आहे. परंतु आता या परतीच्या पावसाने जो काही धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नक्की वाचा:शासनाचे पंचनाम्याचे आदेश म्हणजे शेतकऱ्यांनच्या जखमेवर मिट चोळण्या सारखे- गोपाल तायडे
Share your comments