राज्यातील अनेक शहरांचे तापमान कमी होऊन थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. राज्यात काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र सकाळी वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. मध्य महाराष्ट्र आणि आणि विदर्भातही पारा खाली घसरला आहे. त्यामुळे थंडी वाढवण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस राज्यात प्रामुख्याने कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमान पारा १४ अंशांच्या खाली गेला आहे. पुढील २४ तासात कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात मागील २४ तासात किमान तापमानाचा खाली घसरले आहे त्यामूळे राज्यातील वातावरणात गारवा पसरला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमी होऊ लागले आहे. राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. तसेच धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा पुन्हा १४ अंशांच्या खाली घसरला आहे.
हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही, तसेच थंडीत वाढ होणार आहे .पुढील चार ते पाच दिवस १ ते २ अंश सेल्सियसनं तापमानात चढ उतार होण्याची शक्यता असून कोरडं हवामान राहील असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.
Share your comments