Weather Forecast: देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा (Monsoon) दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात अजूनही मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. येत्या काही दिवसांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक भागात पावसाची नवीन फेरी सुरू होऊ शकते. या काळात विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे. मध्य प्रदेशात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
यासंदर्भात अनेक भागात ऑरेंज आणि यलो अलर्टही (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भारतात लंपी त्वचा रोग कोठून आला, हा रोग झालेल्या जनावरांचे दूध पिऊ शकतो का? जाणून घ्या...
या काळात अनेक भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे. पावसासह भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने चारधाम यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच शक्य असल्यास प्रवास पुढे ढकलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, 13 ऑगस्टपासून बंगालच्या उपसागरावर आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, 15 ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची दाट शक्यता आहे.
भारीच की! तीन महिन्यांत 6 लाखांपर्यंत नफा, चिया बियांची लागवड करून शेतकरी होणार मालामाल
स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या एजन्सीनुसार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाची नवीन फेरी सुरू होऊ शकते.
महेश पलावत म्हणतात की 'मान्सून ट्रफ' काही काळ उत्तरेकडे सरकेल आणि शनिवारपासून दिल्ली आणि इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या काळात फक्त किरकोळ दिलासा अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या:
सुवर्णसंधी! सोने मिळतंय 3700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर...
नोकरीला कंटाळलात! तर करा हा सुपरहिट व्यवसाय, नोकरी विसराल आणि कमवाल लाखो
Share your comments