Weather Update : देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. उत्तर भारतातील पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून मान्सून परती केली आहे. तसंच बिहार, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. तसंच राज्याच्याही बहुतांश भागातून मान्सून परतला आहे.
राज्यातून मान्सूनने माघार घेतली असल्यामुळे राज्यात तापमानाचा चटका वाढला आहे. तसंच ऑक्टोबर हिट आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर वातावरणात देखील बदल झाले आहेत.
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने उत्तरेकडील काही राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवत आहे. यामुळे मुंबई पुण्यासह इतर भागात देखील उकाडा जाणवत आहे. विदर्भातील तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका वाढला आहे. यामुळे नागरिकांना आता घाम फुटू लागला आहे. विदर्भात बहुतांश भागात उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेत.
तापमान वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे.
येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर हवामानात बदल होण्याचीही शक्यता आहे. आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवणार आहे.
Share your comments