येत्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण (weather)निर्माण झाले आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा चालू आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर वाटचाल मंदावलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा वेग धरला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत गोव्यासह, कोकणच्या(konkan) काही भागात जोरदार पाऊसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.
जवळच्या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता :
दरवर्षी पेक्षा यंदा च्या वर्षी केरळ मध्ये मान्सून चे आगमन लवकर आणि जोरदार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा यंदा च्या वर्षी सरासरी 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दोनच दिवसात पावसाने केरळ राज्य व्यापून टाकले आहे शिवाय दोनच दिवसात कर्नाटक(karnatak) किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. कारवार, चिकमंगळूरू, बंगळूरू, धर्मापूरीपर्यंतच्या भागात मॉन्सूनने चांगली जोरदार वाटचाल केली आहे.
हेही वाचा:वीज पडून होणारी जीवित हानी रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वापर ‘दामिनी’ हे ॲप, वाचा सविस्तर
दरवर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी पावसाचा जोर हा अधिक आहे हवामान खात्याने हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज :
सध्याचा आठवडा हा मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक असल्याने गुरूवारपर्यंत मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तामिळनाडूचा आणखी काही भागासह कोकण, गोव्यात मान्सून बरसेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. शिवाय पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरासह, ईशान्य भारतातील काही राज्ये, सक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
- वायव्य भारत-९२ ते १०८ टक्के
- मध्य भारत-१०६ टक्के
- दक्षिण भारत-१०६ टक्के
- ईशान्य भारत-९६ ते १०६ टक्के
हेही वाचा:केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवर 1 जून पासून बंदी
ही सरासरी ही दरवर्षी पेक्षा अधिक आहे त्यामुळे यंदा चे वर्ष हे शेतकरी वर्गासाठी अधिक सुखकर जाणार आहे. यंदा महाराष्ट्रा राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात या भागात सुद्धा पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Share your comments