राज्यात अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झालेल्या विदर्भ आणि कोकणात पाऊस सर्वत्र नाही. मागील दोन, तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार आहे.
रविवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु पुणे, सातारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभाग सोडल्यास ८ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. तर कोकणात १० ऑगस्टपर्यंत पाऊस असेल. त्यानंतर त्याचा जोर कमी होईल.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच या अंदाजानुसार परिस्थिती दिसुन येत आहे. कोकण आणि विदर्भातील काही भाग वगळला असता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे.
दरम्यान राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह, पुणे जिल्ह्यातही पावसाने उघडीप घेतली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर पुण्यात ढगाळ राहील वातावरण ढगाळ राहील, अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Share your comments