मान्सून २३ जूनपासून विदर्भ व मराठवाड्यात तेलंगणातून तर नाशिकसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात कोकणातून दाखल होणार आहे. तोपर्यंत विदर्भ वगळता उर्वरित राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजे ताशी १५ किलोमीटरच्या आसपास वाऱ्याचा वेग राहू शकतो, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यात मान्सून सरासरी १० जूनदरम्यान दाखल होतो. परंतु यंदा चक्रीवादळामुळे अद्याप तो कोकण वगळता इतर भागात दाखल झाला नाही. त्यामुळे राज्यभरातील खरीप पेरण्या लांबल्या आहेत.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नगर, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात बागायती कापसाची लागवड करण्यात आली असून पावसाची प्रतीक्षा आहे. चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.
२३ ते २९ जूनदरम्यान कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होऊन सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. २३ जूनला सुरू होणाऱ्या व ६ जुलैला संपणाऱ्या पंधरवड्यात कोकण, विदर्भ व मराठवाड्यात पेरणीयोग्य असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात मात्र साधारण मोसमी पावसाची शक्यता आहे.
नवरदेवाचा नादच खुळा! लग्नासाठी वऱ्हाड आणलं 51ट्रॅक्टरवर बसून; स्वत:ही ट्रॅक्टरवरच आला
Share your comments