1. हवामान

Rainfall forecast : यंदाचा मान्सून वेळेआधी आणि विशेषतः सरासरीपेक्षा जास्त

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी पाऊस वेळेच्या अगोदरच बरसणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

Rainfall forecast: This year's monsoon is premature and especially above average

Rainfall forecast: This year's monsoon is premature and especially above average

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी पाऊस वेळेच्या अगोदरच बरसणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा ९८ टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा लवकर आणि आगमनाच्या वेळेपूर्वी पाऊस सुरू होईल. यावेळी हवामान खात्याने पाऊस वेळेवर येणार असल्याचा व सरासरीच्या ९८ टक्के पाऊस किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्कायमेटने जाहीर केले आहे की १ जूनपासून नियमित वेळेत पाऊस सुरू होईल. केरळमध्ये मान्सूनची सुरुवात प्रामुख्याने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील सागरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवते.

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मान्सून नेहमीपेक्षा लवकर थांबला आहे. या एकत्रित परिणामामुळे अरबी समुद्राच्या मध्यभागी अँटीसायक्लोन नष्ट झाले आहेत. मान्सूनची लाट वाढवण्यासाठी हे उपयुक्त ठरते. केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या मते, नैऋत्य मान्सून यावर्षी २६ तारखेला केरळमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

वेळेवर पडणाऱ्या पावसामुळे शेतीला सर्वाधिक फायदा होतो. पावसाळा अनिश्चित आणि अनियमित असतो. त्यामुळे तो येईपर्यंत आपल्याला केवळ तर्कावर अवलंबून राहावे लागेल. मात्र यंदा स्कायमेटचा अंदाज खरा ठरला आणि पाऊस वेळेवर आला तर त्याचा सर्वाधिक फायदा शेतीला होणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी याचा सर्वाधिक फायदा होऊन शेतकऱ्यांचे परिणामी देशाचे कृषी उत्पन्न वाढेल. याचा फायदा हा देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत जात असतो ही एक साखळी आहे.

महत्वाच्या बातम्या 
अमेरिकन संशोधकांनी केली कमाल! चंद्राच्या मातीवर प्रथमच उगवले रोपटे त्यामुळे होऊ शकतो का चंद्रावरील शेती करण्याचा मार्ग मोकळा?
Business Idea: बारामाही डिमांड मध्ये असलेला हा व्यवसाय बनवु शकतो कमी वेळेत श्रीमंत; वाचा सविस्तर 

English Summary: Rainfall forecast: This year's monsoon is premature and especially above average Published on: 14 May 2022, 10:01 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters