Rain Update: हवामान विभागाने (Meteorological Department) सांगितलेल्या अंदाजानुसार या वर्षी मान्सून (Monsoon) लवकर दाखल होणार होता, पण मान्सून लवकर काही दाखल झाला नाही. मान्सूनने सर्वांना वाट पाहायला लावली. पण आता मान्सून अखेर कोकणात (Koakan) दाखल झाला आहे.
तीन ते चार दिवसात मान्सून सक्रिय होणार
राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या इतर भागात देखील सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. (Mumbai, Pune) तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे.
Success Story: सावित्रीच्या लेकींनी करून दाखवले; महिलांची शेळी पालनातून कोटींची उड्डाणे
शेतकऱ्यांना दिलासा
शुक्रवारी (10 जून) नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली आहे. मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे. आता मान्सून कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या तीन चार दिवसात मान्सून राज्यातील इतर भागात दाखल होईल.
मेघराजा तू रुसला काय? पुन्हा तारीख बदलली, राज्यातील आगमन लांबलं
Share your comments