राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावलीय.
दरम्यान, मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहेत. तर काही जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही ही मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा अंदाज आहे. हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी याबाबतची माहिती दिल्यानुसार, रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
रायगडमध्ये पुढचे सलग 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्येही आज सरी बरसण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ब्रेकिंग न्यूज : दूधाच्या दराबाबत राधाकृष्ण विखेपाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती; दर वाढणार?
Share your comments