मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने एकीकडे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची पिके पाण्यात आहेत. याचे उदाहरण म्हणजे पालघर जिल्ह्यातील (Palghar district crisis) तब्बल 75 हेक्टर शेती संकटात आहे.
पावसामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पालघर जिल्ह्यातील 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त भातशेतीचे क्षेत्र परतीच्या पावसामुळे संकटात सापडले आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून परतीच्या पावसानं (rain) दमदार हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळं संकटात सापडली आहे.
परतीच्या पावसाचा सुळसुळाट! सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी चिंतेत
शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण म्हणजे तयार झालेल्या भात पिकाला मुसळधार पावसाने (rain) चांगलंच झोडपले आहे. तयार झालेली भात पिके शेतातच असून ऐन भात पिकं काढण्याच्या वेळीच पावसानं हजेरी लावून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
दिलासादायक! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 132 कोटींचा निधी
सोयाबीन, कापूस पिकांनाही फटका
राज्यातल्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वच पिके (crops) संकटात आली आहेत. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात या ठिकाणी देखील पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर; 'या' दिवशी रक्कम जमा होणार
आजचा दिवस वाया घालवू नका, संधीचं सोनं करा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
दिलासादायक! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 132 कोटींचा निधी
Share your comments